तुंगतमध्ये सत्तांंतर, सरपंचपदी डॉ. अमृता रणदिवे

पंढरपूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या तुंगत ग्रामपंचायतीमध्ये सत्ता परिवर्तन झाले आहे. काँग्रेसचे नेते प्रकाश पाटील यांच्या गटाने येथे सत्ता मिळवली आहे. भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक गटाचा सुपडासाफ झाला आहे. पाटील यांच्या गटाने सरपंचपदासह १३ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. डॉ. अमृता रणदिवे या सरपंचपदी निवडून आल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालाकडे संपूर्ण पंढरपूर… Continue reading तुंगतमध्ये सत्तांंतर, सरपंचपदी डॉ. अमृता रणदिवे

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना त्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे : जयंत पाटील

नागपूर (वृत्तसंस्था) : सीमाभागातील मराठी माणसांवर पाळत ठेवली जात आहे. जाणीवपूर्वक मराठी माणसाला त्रास दिला जातो आहे. याचा आपण जाब विचारला पाहिजे. कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्या भाषेत बोलत आहेत त्याच भाषेत त्यांना उत्तर द्यायला पाहिजे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटक सरकारला ठणकावून सांगितले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर आज (मंगळवारी) अधिवेशनात… Continue reading कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना त्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे : जयंत पाटील

फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत : बावनकुळे

नागपूर (वृत्तसंस्था) : मी प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री झाले पाहिजे, असे विधान भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केले आहे. बावनकुळेंच्या विधानानंतर महाराष्ट्रातील राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे. पूर्व नागपुरात संत जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बावनकुळे बोलत होते. या कार्यक्रमाला फडणवीसही उपस्थित होते. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘जो-जो समाज त्यांच्याकडे गेला, ज्या-ज्या समाजावर अन्याय… Continue reading फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत : बावनकुळे

विरोधकांचा चहापानावर बहिष्कार, सोमवारपासून हिवाळी अधिवेशन 

नागपूर : विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपुरात सुरू होत आहे.त्याआधी सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना चहापानाच्या कार्यक्रमाला आमंत्रित केले; पण विरोधकांनी यावर बहिष्कार टाकला आहे. सोमवार, दि. १९ डिसेंबरपासून नागपूरमध्ये राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. २९ डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. कोरोना संकटानंतरचे नागपूरमध्ये होणारे हे पहिल अधिवेशन आहे. त्यामुळे नागपूरमध्ये विशेष तयारी करण्यात आली आहे. नागपुरात… Continue reading विरोधकांचा चहापानावर बहिष्कार, सोमवारपासून हिवाळी अधिवेशन 

बीएसएफमध्ये भरती झालेल्या शेतकरी पुत्राचा सत्कार

सांगोला (प्रतिनिधी) : नेपतगाव गावचे शेतकरी पुत्र विकास कदम यांची इंडियन आर्मीमध्ये निवड झाल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सचिन पाटील, नेपतगाव ग्रामपंचायतीतर्फे त्यांचा जिल्हा परिषद शाळा येथे सत्कार करून शाळेतील लहान मुलांना खाऊचे वाटप केले. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सचिन पाटील म्हणाले, कृषीप्रधान भारत देशाचा गाडा फक्त दोघांच्या खांद्यावर ओढला जातोय. ते म्हणजे… Continue reading बीएसएफमध्ये भरती झालेल्या शेतकरी पुत्राचा सत्कार

फडणवीसांची हत्तीवरून मिरवणूक काढणार : दिलीप धोत्रे

पंढरपूर (प्रतिनिधी) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कोणाच्याही घराला धक्का न लावता त्यांनी पंढरपूरचा विकास केला, तर त्यांची आम्ही पंढरपुरातून हत्तीवरून मिरवणूक काढू, अशी घोषणा  बैठकीमध्ये मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमधील स्थानिक नागरिक, व्यापारी आणि वारकऱ्यांची बैठक पार पडली. पंढरपूर कॉरिडोरला स्थानिक नागरिक आणि… Continue reading फडणवीसांची हत्तीवरून मिरवणूक काढणार : दिलीप धोत्रे

माझे ऐकले नाही तर निधी नाही : नितेश राणे

कणकवली : ‘माझ्या विचाराचा सरपंच निवडून आला नाही, तर गावच्या विकासाला निधी देणार नाही. तुम्ही याला धमकी समजा नाहीतर अन्य काही, अशा शब्दात भाजपाचे आ. नितेश राणे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान मतदारांना दमदाटी केली आहे. कणकवली-नांदगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आ. नितेश राणे बोलत होते. राणे पुढे म्हणाले, ‘निधी वाटप आता माझ्या हातात आहे हे लक्षात… Continue reading माझे ऐकले नाही तर निधी नाही : नितेश राणे

समृध्दी महामार्ग न होण्यासाठी अनेकांचे प्रयत्न : एकनाथ शिंदे

नागपूर (वृत्तसंस्था) : समृध्दी महामार्गाला विरोध करणाऱ्यांमुळे या प्रकल्पाच्या कामात खूप अडचणी आल्या. जमीन अधिग्रहणाला खूप विरोध झाला. लोकांना विरोध करायला लावला. हा प्रकल्प होऊ नये, जमिनी दिल्या जाऊ नयेत म्हणून बैठका झाल्या’, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अप्रत्यक्षपणे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे तोंडसुख घेतले. समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचा हा… Continue reading समृध्दी महामार्ग न होण्यासाठी अनेकांचे प्रयत्न : एकनाथ शिंदे

स्वार्थी राजकारणामुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याचा धोका : मोदी

नागपूर (वृत्तसंस्था) : मी महाराष्ट्र आणि देशातील सामान्य जनतेला भारतीय राजकारणात नव्याने येत असलेल्या एका विकृतीपासून सावध करु इच्छितो. ती विकृती म्हणजे शॉर्टकटचे राजकारण. देशातील काही नेते शॉर्टकटचे राजकारण करण्याच्या नादात देशाच्या तिजोरीतील पैसा आणि सामान्य करदात्यांची कमाई उधळून लावत आहेत. या स्वार्थी राजकारणामुळे भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याची गंभीर धोका आहे. त्यामुळे कोणतेही पायाभूत प्रकल्प उभारताना… Continue reading स्वार्थी राजकारणामुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याचा धोका : मोदी

डबल इंजिन सरकारमुळेच समृद्धी महामार्गाची पूर्तता : फडणवीस

नागपूर (वृत्तसंस्था) : राज्यात सरकार बदलून डबल इंजिन सरकार आले नसते तर समृद्धी महामार्ग वेगाने पूर्ण झाला नसता, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीवर निशाणा साधला. समृद्धी महामार्ग तसेच नागपूर एम्स रुग्णालयाचे लोकार्पण झाल्यानंतर या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, अडीच वर्षांपूर्वी समृद्धी महामार्गाचे काम संथ… Continue reading डबल इंजिन सरकारमुळेच समृद्धी महामार्गाची पूर्तता : फडणवीस

error: Content is protected !!