लखीमपूर हिंसाचार : ११ ऑक्टोंबरला महाराष्ट्र बंदची हाक

मुंबई (प्रतिनिधी) : उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचाराच्या  निषेधार्थ ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद पुकारण्यात आल्याची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषदेत केली. लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने हा बंद पुकारला आहे. मात्र, महाविकास आघाडीमधील… Continue reading लखीमपूर हिंसाचार : ११ ऑक्टोंबरला महाराष्ट्र बंदची हाक

टीईटी, आरोग्य विभागाची परीक्षा एकाच दिवशी : आरोग्यमंत्र्यांनी काढला मार्ग    

मुंबई  (प्रतिनिधी) :  आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी २४ ऑक्टोबरला ‘गट क’ आणि ३१ ऑक्टोबरला ‘गट ड’ ची परीक्षा घेण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी  टीईटी परीक्षा ३१ ऑक्टोबरला होणार आहे. दोन्ही परीक्षा एकाचदिवशी आल्याने दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.  त्यामुळे विद्यार्थ्यांतून नाराजी व्यक्त… Continue reading टीईटी, आरोग्य विभागाची परीक्षा एकाच दिवशी : आरोग्यमंत्र्यांनी काढला मार्ग    

तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी मिलिंद नार्वेकर यांची नियुक्ती 

मुंबई (प्रतिनिधी) : देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण २८ सदस्यांचा समावेश असलेल्या सदस्यांची यादी आंध्र प्रदेश सरकारने जाहीर केली.  आंध्र प्रदेश सरकारने बुधवारी तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) ट्रस्टच्या नव्या बोर्डची स्थापना केली. यामध्ये २८ सदस्य असून ४ पदसिद्ध… Continue reading तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी मिलिंद नार्वेकर यांची नियुक्ती 

दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर गृहमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

मुंबई (प्रतिनिधी) : दिल्ली पोलिसांनी मुंबईत घातपात घ़डवून आणण्याचा डाव उधळून लावत ६ दहशतवाद्यांना अटक केली. त्यापैकी  एकाचे मुंबई कनेक्शन आता समोर आले आहे. तर या दहशतवाद्यांनी मुंबई लोकलची रेकी केल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज (बुधवार) संध्याकाळी बैठकीचे आयोजन केले आहे. यावेळी मुंबई पोलीस आयुक्तांसह… Continue reading दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर गृहमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

शाळा, महाविद्यालये कधी सुरू होणार ? : उदय सामंतांची महत्त्वाची माहिती

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला आहे. हळूहळू सर्व व्यवहार पूवर्पदावर येत असताना शाळा, महाविद्यालये अद्याप सुरू झालेली नाहीत. याकडे पालक, विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिले असताना राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली. सामंत म्हणाले की, येत्या १ नोव्हेंबरपासून राज्यात महाविद्यालय सुरु करण्याचा विचार आहे. राज्यात… Continue reading शाळा, महाविद्यालये कधी सुरू होणार ? : उदय सामंतांची महत्त्वाची माहिती

गाड्यांच्या क्रमांकांमधील बदलानंतर आता नितीन गडकरींची मोठी घोषणा

नागपूर (प्रतिनिधी) : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नवीन वाहनांसाठी भारत सिरीजची अधिसूचना जारी केल्यानंतर  आता  कर्णकर्कश्य हॉर्न्सबाबत  लवकरच  मोठे बदल केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी  यांनी दिली. गाड्यांच्या हॉर्नमध्ये बदल करण्यात येणार असून यासाठी लवकरच नवीन नियम  तयार केले जाणार आहेत. हे नियम थेट वाहननिर्मात्या कंपन्यांसाठी असतील, असेही… Continue reading गाड्यांच्या क्रमांकांमधील बदलानंतर आता नितीन गडकरींची मोठी घोषणा

…अखेर नारायण राणे यांना अटक !

रत्नागिरी (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्र्यांविरोधातलं वक्तव्य अखेर भोवलं असून त्यांना वेळापूर्वी अटक करण्यात आली आहे. रत्नागिरी पोलिसांनी राणे यांना अटक केली असून संगमेश्वर पोलीस स्टेशनला नेण्यात येत आहे. भाजप नेते प्रसाद लाड यांनी ही माहिती दिली आहे. नारायण राणे यांनी ‘…तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानशिलात लगावली असती’, असं वक्तव्य केलं.… Continue reading …अखेर नारायण राणे यांना अटक !

पवारसाहेब, माझ्या बोलण्याचा प्रबोधनकारांच्या पुस्तकांशी काय संबंध ते सांगा : राज ठाकरे

पुणे (प्रतिनिधी) : ‘मी प्रबोधनकार ठाकरेही वाचलेत आणि यशवंतराव चव्हाणही वाचलेत. मी जे बोललो त्याचा माझ्या आजोबांच्या पुस्तकांशी काय संबंध होता हे मला पवारसाहेबांनी समजावून सांगावं’ असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना लगावला. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यात जातीपातींचं राजकारण वाढलं, असा आरोप ठाकरे यांनी केला होता. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद… Continue reading पवारसाहेब, माझ्या बोलण्याचा प्रबोधनकारांच्या पुस्तकांशी काय संबंध ते सांगा : राज ठाकरे

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : १३ परप्रांतीय मजुरांचा मृत्यू

बुलडाणा (प्रतिनिधी) : लोखंडी सळ्या घेऊन जात असलेला टिप्पर उलटून झालेल्या भीषण अपघातात १३ परप्रांतीय मजुरांचा मृत्यू झाला. हा अपघात आज (शुक्रवार) दुपारी सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड गावानजीक तडेगाव फाट्याजवळ घडला. तीन मजुरांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता रुग्णालयात उपचार सुरु आहेत. समृद्धी  महामार्गाच्या कामावर दुसरबीड येथून मजूर घेऊन हा टिप्पर चालला होता. तडेगाव फाट्याजवळ… Continue reading समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : १३ परप्रांतीय मजुरांचा मृत्यू

मराठा आरक्षणासाठी २ सप्टेंबरला सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन : विनायक मेटे

मुंबई (प्रतिनिधी) : मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण मराठा समाजाच्या विरोधात निर्णय घेतले. त्यांची समितीतून तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी करीत चव्हाण यांना ‘विश्वासघातकी’ हा पुरस्कार दिला जाणार असल्याचा टोला शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी लगावला. तसेच मराठा आरक्षणासाठी २ सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. ते आज… Continue reading मराठा आरक्षणासाठी २ सप्टेंबरला सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन : विनायक मेटे

error: Content is protected !!