निवडणूक प्रचार सभांवर पावसाचे पाणी ; उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीसांची सभा रद्द

मुंबई : राज्यात गेल्या 4 दिवसांपासून अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच, आज वादळी वाऱ्यासह राजधानी  मुंबईला पावसाने चांगलंच झोडपून काढलं. अवकाळी पावसामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत ठिकठिकाणी अनेक दुर्घटना घडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या अवकाळी पावसामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तर याचा फक्त राजकीय पक्ष आणि… Continue reading निवडणूक प्रचार सभांवर पावसाचे पाणी ; उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीसांची सभा रद्द

पैशाचा खेळ अन् मतदानावेळी सरकारी कर्मचाऱ्याकडे आढळली भाजप उमेदवाराची प्रचार पत्रके

अहमदनगर : राज्यात आज 11 लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. राज्यात होणाऱ्या काही लक्षवेधी निवडणुकींपैकी अहमदनगर लोकसभा मतदारसंघाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान अहमदनगरमध्ये   महायुतीचे डॉ. सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे निलेश लंके यांच्यात चुरशीची लढत होत आहे. मात्र मतदानाच्या आधीच्या रात्री पारनेर तालुक्यात दोन्ही उमेदवारांचे कार्यकर्ते भिडल्याचे पाहायला… Continue reading पैशाचा खेळ अन् मतदानावेळी सरकारी कर्मचाऱ्याकडे आढळली भाजप उमेदवाराची प्रचार पत्रके

सावकारकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

कुरुंदवाड :  शिरोळ तालुक्यातील शेडशाळ येथील भालचंद्र कल्लाप्पा तकडे (वय 44) या शेतकऱ्याने शेतातील गोठ्याच्या शेडमध्ये गळफास  घेऊन जीवन संपवल्याची घटना घडली आहे. ही घटना आज (दि.13) दुपारी दीडच्या सुमारास उघडकीस आली. मृत भालचंद्र यांच्या खिशातून पोलिसांना एक चिट्ठी मिळाली आहे. त्यामध्ये  सावकारांची नावे असून त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा उल्लेख आहे. तसेच सावकारांच्‍या… Continue reading सावकारकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

राज्यात महायुतीची लाट; मोदींची सभा यशस्वी करणार

मुंबई : राज्यात चारही टप्प्यात झालेले मतदान महायुतीला अनुकूल असून चौथ्या टप्प्यापर्यंत चांगले यश महायुतीला मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. आज मुंबई प्रदेश कार्यालयात आले असता माध्यमांशी बोलताना सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना महायुतीच्या विजयाचीही खात्री सांगितली. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर… Continue reading राज्यात महायुतीची लाट; मोदींची सभा यशस्वी करणार

बलात्काऱ्यांना भाजपानं संरक्षण दिलं : अलका लांबा

मुंबई : भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत. याच प्रज्वल रेवन्नांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मते मागितली आहेत. रेवन्नाचा भांडाफोड होताच त्याला भारतातून परदेशी पळून जाऊ दिले. महिलांवर अत्याचार करणाऱ्या प्रज्वल रेवन्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी एक शब्द बोलले नाहीत. या अत्याचारी नराधमाला परदेशातून… Continue reading बलात्काऱ्यांना भाजपानं संरक्षण दिलं : अलका लांबा

राऊतांच्या ‘त्या’ आरोपांवर उदय सामंतांचा पलटवार..!

मुंबई – सध्या लोकसभा रणांगण सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. लोकसभेच्या अनुषंगाने राज्यात सर्वत्र प्रचार सुरु आहे. महाराष्ट्रातील तीन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून, अजून आज चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. प्रचारादरम्यान विरोधी पक्ष नेते आपली आक्रमक भूमिका मांडत एकमेकांवर तोफ डागत आहेत. अशातच आज ठाकरे गटाचे खासदार संजय… Continue reading राऊतांच्या ‘त्या’ आरोपांवर उदय सामंतांचा पलटवार..!

इचलकरंजीत एकाचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करून खून

इचलकरंजी : येथील गणेशनगरमधील राकेश धर्मा कांबळे (वय 32) या तरुणाचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे.इचलकरंजीतील  टोळक्याने पाठलाग करून धारदार शस्त्रांनी वार करून राकेश कांबळे याचा खून केला. ही घटना पंचगंगा साखर कारखाना परिसरातील पेट्रोल पंपाजवळ खुल्या जागेत रविवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. राकेश हा अत्याधुनिक यंत्रमागावर काम करीत होता.… Continue reading इचलकरंजीत एकाचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करून खून

शरद पवारांनी फुगवलेला ‘मविआ’चा फुगा 4 जूनला फुटणार  : चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राज्यात आज चौथ्या टप्प्यात 11 लोकसभेच्या जागांसाठी मतदान होत आहे. त्याआधी प्रचारादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले. यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येत्या 4 जूनला महाविकास आघाडीचा फुगा फुटलेला दिसेल. तसेच या निवडणुकीत महायुती बाजी मारेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुप्रियाताई पराभूत होत असल्यामुळे महाविकास आघाडीचा… Continue reading शरद पवारांनी फुगवलेला ‘मविआ’चा फुगा 4 जूनला फुटणार  : चंद्रशेखर बावनकुळे

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र काढण्याचे काम पंतप्रधान करतात ; शरद पवारांचा पलटवार

ठाणे : संसदीय लोकशाही पद्धतीवर आघात करण्याचे काम भाजप कडून केले जात आहे. महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोनं काढण्याचे काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी आहे, असे म्हणत शरद पवारांनी मोदींच्या सभेतील भाषणाचा संदर्भ देत त्यांच्यावर पलटवार केला. तसेच, बाळ्या मामा यांची निवड आम्ही सर्वांनी केली, बाळ्यामामा सर्वांना हिंमत देणारा नेता तुमच्यासमोर आहे. त्यामुळे, त्यांना मोठ्या… Continue reading महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र काढण्याचे काम पंतप्रधान करतात ; शरद पवारांचा पलटवार

…तर नरेंद्र मोदींनाही राजकारणातून निवृत्त करणार का? : रमेश चेन्नीथला

मुंबई : भारतीय जनता पक्षाने ७५ वर्ष वय झालेल्यांना सक्रीय राजकारणातून बाजूला केले आहे. भाजपा पक्ष संघटन मजबूत करणारे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व मुरली मनोहर जोशी यांनाही ७५ वर्ष वयाचे कारण देऊन राजकारणातून बाजूला केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही याच नियमानुसार ७५ वर्ष झाल्यानंतर राजकारणातून निवृत्त करून अमित शाह यांना पंतप्रधान करणार का? या… Continue reading …तर नरेंद्र मोदींनाही राजकारणातून निवृत्त करणार का? : रमेश चेन्नीथला

error: Content is protected !!