माघारीनंतर भाजपच्या भूमिकेवर टीका करणे अयोग्य : पवार

मुंबई (प्रतिनिधी) : भाजपने अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय उशिरा का होईना घेतला. याचा आनंद आहे, भाजपने माघार घेतली हेच महत्त्वाचे आहे. एकदा भाजपने माघार घेतल्यानंतर त्यांच्या भूमिकेवर शंका घेण्याने काहीही होणार नाही आणि भाजपने उशिरा निर्णय घेतला, अशी टीका करण्यात आता काहीही अर्थ नाही. रमेश लटके यांच्या निधनानंतर त्यांची पत्नीची बिनविरोध निवड व्हावी, अशी… Continue reading माघारीनंतर भाजपच्या भूमिकेवर टीका करणे अयोग्य : पवार

अजित पवार यांच्यासह ७६ संचालक पुन्हा ईडीच्या रडारवर

मुंबई (प्रतिनिधी) : राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणी अजित पवार यांच्यासह ७६ संचालकांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. क्लोजर रिपोर्टनंतर अनेक जनहित याचिका दाखल करण्यात आल्याने आता सातत्याने पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली जात होती. राज्य सहकारी बँकेच्या २५… Continue reading अजित पवार यांच्यासह ७६ संचालक पुन्हा ईडीच्या रडारवर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

मुंबई (प्रतिनिधी) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वर्षा बंगल्यावर बैठक झाली असून या भेटीत अंधेरी पोटनिवडणूक आणि आगामी निवडणुकांबाबत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. तसेच आगामी निवडणूकीत भाजप, शिंदे गट आणि राज ठाकरे एकत्र येणार का? यावरूनही तर्कवितर्क लढवले जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यासोबतच भाजपचे नेते… Continue reading मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

नाटककार महेश एलकुंचवार यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

मुंबई (प्रतिनिधी) : प्रसिद्ध नाटककार, पटकथाकार, लेखक, निबंधकार, अभिनेते आणि प्रा. महेश एलकुंचवार यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. टाटा समूहातर्फे आयोजित केला जाणाऱ्या साहित्य महोत्सवात हा पुरस्कार दिला जाणार आहे. महेश एलकुंचवार हे भारतातील सर्वात प्रभावशाली साहित्यिक म्हणून ओळखले जातात. भारतीय रंगभूमीवरील महान नाटककार म्हणूनही त्यांचा नावलौकिक आहे. ‘यातनाघर’, ‘वासनाकांड’, ‘गार्बो’, ‘वाडा चिरेबंदी’… Continue reading नाटककार महेश एलकुंचवार यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

अंधेरी पोटनिवडणुकीत ‘मशाल विरुद्ध कमळ’ सामना रंगणार

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडून ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी ऋतुजा लटकेंकडून मोठे शक्तिप्रदर्शन केले. त्यांच्या अर्ज दाखल करण्यासाठी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, भाजपकडून मुरजी पटेल हे अंधेरीची पोटनिवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे या पोटनिवडणुकीत मशाल विरुद्ध कमळ असा थेट सामना रंगणार… Continue reading अंधेरी पोटनिवडणुकीत ‘मशाल विरुद्ध कमळ’ सामना रंगणार

ऋतुजा लटके यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबई (प्रतिनिधी) : अंधेरी पोटनिवडणुकीतील ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. उद्या शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत लटके यांना राजीनामा स्वीकारल्याचे पत्र द्या, असे आदेश हायकोर्टाने मुंबई महापालिकेला दिले आहेत. न्यायालयाच्या निकालामुळे ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी लटके उद्या ठाकरे गटातर्फे उमेदवारी… Continue reading ऋतुजा लटके यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

एसटी महामंडळाला राज्य सरकारकडून ३०० कोटींची मदत

मुंबई (प्रतिनिधी) : राज्य सरकारकडूने एसटी महामंडळाला तातडीने मदत जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारने ३०० कोटी रुपयांची मदत एसटी महामंडळाला देण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याच्या पगारासाठी ३६० कोटी रुपयांच्या निधीची गरज भासते; पण राज्य सरकारने ३०० कोटी रुपयांचीच मदत जाहीर केली आहे. दरम्यान, या मदतीवरून एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग… Continue reading एसटी महामंडळाला राज्य सरकारकडून ३०० कोटींची मदत

चिन्ह आणि नावाच्या वाटपामध्ये शिंदे गटाला झुकते माप

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पक्ष चिन्ह आणि नावाच्या वाटपामध्ये विरुद्ध बाजूला झुकते माप दिल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाने केला आहे. शिवाय याबाबत १२ मुद्द्यांचे पत्रही ठाकरे गटाने आयोगाला लिहिले आहे. या पत्रात निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. याच निवडणूक आयोगाने चिन्हासंदर्भात जे निर्णय… Continue reading चिन्ह आणि नावाच्या वाटपामध्ये शिंदे गटाला झुकते माप

ढाल-तलवार चिन्हावर हिंदुत्वाची क्रांती घडवू : क्षीरसागर

मुंबई (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या ज्वलंत इतिहासाची साक्ष म्हणजे ढाल- तलवार ही निशाणी आहे. ढाल-तलवार घेऊन बाळासाहेबांची शिवसेना हिंदुत्वाची लढाई लढेल. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमचे युद्ध सुरू आहे. या चिन्हाच्या मदतीने बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष त्यांच्या विचारांना पुढे घेऊन जाईल आणि राज्यात क्रांती घडवेल, अशी… Continue reading ढाल-तलवार चिन्हावर हिंदुत्वाची क्रांती घडवू : क्षीरसागर

भाजपनेच शिवसेना फोडली; जयंत पाटील यांचा आरोप

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षात झालेली बंडखोरी ही शिवसेनेची अंतर्गत बंडखोरी कधीच नव्हती, ही भाजपा पुरस्कृत बंडाळी होती. भाजपने शिवसेना फोडली. शिवसेना संपूर्ण संपवण्याचे कारस्थान रचल्याचा स्पष्ट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर आता निवडणूक आयोगानं दोन्ही गटांना वेगळे नाव आणि निवडणूक चिन्ह बहाल… Continue reading भाजपनेच शिवसेना फोडली; जयंत पाटील यांचा आरोप

error: Content is protected !!