संजय राऊत स्क्रिझोफ्रेनिया झालेला रूग्ण : शिवतारे

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी जे बंड पुकारले त्याला संजय राऊत जबाबदार आहेत. तसेच सध्याची त्यांची अवस्था स्क्रिझोफ्रेनिया झालेल्या रूग्णासारखी आहे, असा शब्दांत विजय शिवतारे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांची निष्ठा शिवसेनेसोबत किती आहे आणि शरद पवारांसोबत किती आहे हे सगळ्यांना माहीत आहे. जे महाराष्ट्राला कळतंय, आमदारांना कळतंय… Continue reading संजय राऊत स्क्रिझोफ्रेनिया झालेला रूग्ण : शिवतारे

शिवसेनेतून विजय शिवतारे यांची हकालपट्टी

मुंबई (प्रातिनिधी) : माजी आमदार विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तसे आदेश जारी केले आहेत. शिवतारे यांचे शिवसेना सदस्यत्व देखील रद्द केल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली. शिवतारे हे पुरंदर तालुक्यातून शिवसेनेचे प्रतिनिधीत्व करत होते. विजय शिवतारेंच्या हकालपट्टीनंतर पुरंदरमध्ये शिंदे विरुद्ध ठाकरे संघर्ष पेटण्याची… Continue reading शिवसेनेतून विजय शिवतारे यांची हकालपट्टी

महाराष्ट्र, गुजरातमध्ये पावसाची विश्रांती

मुंबई (प्रातिनिधी) : महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांना दोन आठवडे झोडपून काढल्यानंतर आता पावसाने महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. पुढील तीन ते चार दिवस महाराष्ट्रात पाऊस पडेल; पण जोर कमी असेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरयाणा, जम्मू-काश्मीर आणि राजस्थान या सहा राज्यांमध्ये पुढील तीन दिवसांत… Continue reading महाराष्ट्र, गुजरातमध्ये पावसाची विश्रांती

औरंगाबादच्या ‘छत्रपती संभाजीनगर’ नामांतरास मान्यता

मुंबई (प्रतिनिधी) : तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर केले होते, पण आता शिंदे सरकारने त्यात ‘छत्रपती’ या शब्दाची भर घालत ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामांतर केले आहे. उस्मानाबादचे नामांतर धाराशिव हे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवी मुंबई येथील विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव दिले जाणार आहे. आमच्या कॅबिनेटने हा निर्णय घेतला… Continue reading औरंगाबादच्या ‘छत्रपती संभाजीनगर’ नामांतरास मान्यता

प्रोत्साहन अनुदान योजना लवकर मार्गी लावा : राजू शेट्टी

मुंबई (प्रतिनिधी) : राज्य शासनाने नियमित पीक कर्जाची परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहनात्मक अनुदान महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना २०१९ मध्ये प्रत्येकी ५० हजार रूपये अनुदानाची घोषणा केली. याबाबत अजूनही प्रशासकीय पातळीवर सचिव व अधिकारी यांच्यामध्ये संभ्रमावस्था असून, आर्थिक वर्षाच्या निकषामध्ये पुन्हा नियमित कर्जफेड करणारा शेतकरी वंचित राहणार असल्याने याबाबत पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेची यादी… Continue reading प्रोत्साहन अनुदान योजना लवकर मार्गी लावा : राजू शेट्टी

सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

मुंबई (प्रातिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील आठ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत ढकलल्या आहेत.… Continue reading सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

‘धर्मवीर’ चित्रपट आवडला नाही : मुख्यमंत्री शिंदे

मुंबई (प्रतिनिधी) : ‘मी धर्मवीर आनंद दिघे यांच्यावर ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा बनवला. तोही आवडला नाही.’ असा गौप्यस्फोट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांचा रोख हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडेच होता; मात्र त्यांनी नाव घेण्याचे टाळले. आनंद दिघे यांनी शिवसेना मोठी केली; पण त्यांना काय मिळाले? यावर देखील… Continue reading ‘धर्मवीर’ चित्रपट आवडला नाही : मुख्यमंत्री शिंदे

फडणवीस-राज ठाकरेंच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण

मुंबई (प्रतिनिधी) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी राज ठाकरे यांची ‘शिवतीर्थ’ निवासस्थानावर भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आगामी मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची समजली जात आहे. या भेटीत फडणवीसांनी राज ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस केल्याची माहिती आहे. राज ठाकरे व भाजपची वाढलेली जवळीक पाहता भेटीत… Continue reading फडणवीस-राज ठाकरेंच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण

औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतर निर्णयाला स्थगिती

मुंबई (प्रतिनिधी) : उद्धव ठाकरे सरकारने शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या औरंगाबादच्या आणि उस्मानाबादच्या नामांतरच्या निर्णयाला शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिली आहे. उस्मानाबादचे नाव धाराशिव आणि औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने त्यांच्या शेवटच्या बैठकीत घेतला होता. त्या निर्णयाला आता स्थगिती देण्यात आली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला बहुमत चाचणी घ्यायला सांगितली होती. तसे… Continue reading औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतर निर्णयाला स्थगिती

राज्यात पेट्रोल ५, डिझेल ३ रुपयांनी स्वस्त : मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात पेट्रोलच्या करात ५ रुपये आणि डिझेलच्या करात ३ रुपये कपात केल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज (गुरुवारी) रात्री १२ वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी मंत्रिमंडळ बैठक झाली. बैठकीत… Continue reading राज्यात पेट्रोल ५, डिझेल ३ रुपयांनी स्वस्त : मुख्यमंत्र्यांची घोषणा

error: Content is protected !!