राठोड, सत्तार यांच्याविरोधात आता अंजली दमानिया मैदानात

मुंबई (प्रतिनिधी) : शिंदे सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर विरोधी पक्षांनी थेट शिंदे सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. खासकरुन मंत्री अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांच्यावर प्रामुख्याने टीका होत आहे. दोन नावे बघून खूप वाईट वाटल्याचे सांगत  सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीदेखील आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच निशाणा साधला आहे. संजय राठोड आणि अब्दुल सत्तार… Continue reading राठोड, सत्तार यांच्याविरोधात आता अंजली दमानिया मैदानात

‘मला भीती वाटते कारण’ : आमीर खान

मुंबई : अभिनेता आमिर खान मागच्या काही दिवसांपासून त्याचा आगमी चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’मुळे चर्चेत आहे. निवडक चित्रपट करणाऱ्या आमिर खानने १० वर्षांपूर्वी ‘महाभारत’ या पौराणिक ग्रंथावर एक बिग बजेट चित्रपट तयार करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याचे हे स्वप्न अद्याप पूर्ण झालेले नाही; पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आमिरने ‘महाभारत’ ग्रंथावर पौराणिक चित्रपट बनवण्याबद्दल… Continue reading ‘मला भीती वाटते कारण’ : आमीर खान

संजय राठोडांविरुद्ध माझा लढा सुरुच राहील : चित्रा वाघ

मुंबई (प्रतिनिधी) : ‘पूजा चव्हाणच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद दिले जाणे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. संजय राठोड हे जरी पुन्हा मंत्री झाले असले तरीही त्यांच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूच ठेवलेला आहे. माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. लढेंगे… जितेंगे…’ असे ट्वीट करत भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोडांच्या मंत्रिपदाला… Continue reading संजय राठोडांविरुद्ध माझा लढा सुरुच राहील : चित्रा वाघ

ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन

मुंबई (प्रतिनिधी) : ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन (वय ६५) यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. गिरगाव येथील घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रदीप पटवर्धन यांनी अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या अचानक निधनामुळे  सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. प्रदीप पटनवर्धन यांना लहानपणापासूनच अभिनयाची खूप आवड होती. कॉलेजमध्ये असताना… Continue reading ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन

महिलेला मंत्रिमंडळात स्थान न देणे दुर्दैवी : सुप्रिया सुळे

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान न देणे दुर्दैवी आहे. संजय राठोंडांना आरोप करणाऱ्यांनीच मंत्रीपद दिल्याचा आनंद आहे, अशी तिखट प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. सुळे म्हणाल्या की, मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिलेला त्यात स्थान मिळालेले नाही, हे अतिशय दुर्दैवी आहे. ५० टक्के लोकसंख्या या देशात महिलांची असून, त्यात १८… Continue reading महिलेला मंत्रिमंडळात स्थान न देणे दुर्दैवी : सुप्रिया सुळे

संशयित व्यक्ती मंत्रिमंडळात नसती तर बरे झाले असते : अजित पवार

मुंबई (प्रतिनिधी) : एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाच्या आज (मंगळवार) झालेल्या विस्तारात संजय राठोड यांचा समावेश झाल्याने त्याविषयी विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही काही संशयातील व्यक्ती मंत्रिमंडळात नसत्या तर बरे झाले असते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. एका पत्रकाराने कोणाचे नाव तुम्ही घेता आहात, असा प्रश्न विचारल्यावर ते नाव तुमहाला माहीत, असे उत्तर… Continue reading संशयित व्यक्ती मंत्रिमंडळात नसती तर बरे झाले असते : अजित पवार

मराठा महासंघाचे उद्या ‘मूक आत्मक्लेश आंदोलन’

मुंबई : मराठा आरक्षणाच्या अनेक मुख्य मागण्या प्रलंबित आहेत. मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून व एकंदर ५० टक्के आरक्षण मर्यादेतूनच आरक्षण मिळावे यासाठी उद्या (मंगळवार) ऑगस्ट क्रांती मैदानात ‘मूक आत्मक्लेश आंदोलन’ करण्यात येणार आहे. या आंदोलनाची दखल अद्याप शिंदे सरकारने घेतली नसल्याने अखिल भारतीय मराठा महासंघ आक्रमक झाला आहे. ‘मराठा आरक्षणासाठी मरण आले तरी चालेल, पण… Continue reading मराठा महासंघाचे उद्या ‘मूक आत्मक्लेश आंदोलन’

अब्दुल सत्तारांच्या चारही मुलांची प्रमाणपत्रे रद्द

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) घोटाळा प्रकरणात माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या चार मुलांची नावे आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चौघांचीही प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत. याप्रकरणी बदनामीसाठी हा सगळा कट रचल्याचे अब्दुल सत्तार यांनी म्हटले. परीक्षा परिषदेकडून जी यादी जाहीर करण्यात आली. त्यामधील सर्व अपात्र… Continue reading अब्दुल सत्तारांच्या चारही मुलांची प्रमाणपत्रे रद्द

नोकरशहांच्या हाती आता राज्याचा कारभार

मुंबई (प्रतिनिधी) : मंत्री आणि राज्यमंत्र्यांचे अधिकार संबंधित विभागाच्या सचिवांना देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत आदेश दिले आहेत. शिंदे- फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे ही व्यवस्था करण्यात आली आहे. ३० जूनला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तेव्हापासून महिना उलटून गेला तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही.… Continue reading नोकरशहांच्या हाती आता राज्याचा कारभार

शिंदेंना सोडून भाजपसोबत आघाडीची ऑफर ठाकरेंनी दिली होती

मुंबई (प्रतिनिधी) : झाले गेलेले सर्व विसरून बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदेंना सोडून एकत्र या, आपण भाजपसोबत आघाडी करू, अशी ऑफर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिली होती, असा दावा शिंदे गटाचे  प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. या ऑफरला भाजप आणि आम्ही ५० आमदार तयार नव्हतो. कारण हे सर्व योग्य ठरले नसते, असे दीपक… Continue reading शिंदेंना सोडून भाजपसोबत आघाडीची ऑफर ठाकरेंनी दिली होती

error: Content is protected !!