केंद्र पुरस्कृत योजनांना गती द्या : मुख्यमंत्री

पुणे (प्रतीनिधि) : प्रधानमंत्री आवास योजनेचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करावे. राज्यातील विविध योजनांसाठी केंद्र सरकार निधी देण्यास तयार आहे. केंद्र सरकारकडे प्रलंबित बाबी मार्गी लागण्यासाठी राज्य शासन आवश्यक पाठपुरावा करेल, अशा विकास योजनांच्या कामाला गती देण्यात यावी, अशी सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी पुणे विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी पर्यटन… Continue reading केंद्र पुरस्कृत योजनांना गती द्या : मुख्यमंत्री

विकासकामांना निधीची कमतरता भासू देणार नाही : मुख्यमंत्री

पुणे (प्रतिनिधी) : पुणे विभागातील जनहिताच्या विकासकामांसाठी कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. जनतेच्या कामांसाठी क्रियान्वयनातील टप्पे कमी करून विकासकामे वेगाने पूर्ण करावी. विकासकामांसाठी प्रशासनाला शासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात पाऊस, अतिवृष्टी, पीक पाहणी आणि विकासकामांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस खासदार… Continue reading विकासकामांना निधीची कमतरता भासू देणार नाही : मुख्यमंत्री

आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांच्या समस्या लवकरच मार्गी : मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अंतिम टप्प्यात आले आहे. प्रकल्पग्रस्तांच्या उर्वरित समस्याही लवकरच निकालात निघतील, अशी ग्वाही आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासन व प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत आमदार मुश्रीफ बोलत होते. तांत्रिक व न्यायालयीन प्रक्रियेमध्ये प्रकल्पग्रस्तांना आवश्यक सर्व पाठबळ देऊ.          बैठकीत अजूनही काही प्रकल्पग्रस्तांना जमिनी मिळाल्या नसल्याचे शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर प्रकल्पग्रस्तांसाठीच्या जमिनी… Continue reading आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांच्या समस्या लवकरच मार्गी : मुश्रीफ

महसूल विभाग शासनाचा कणा : सीईओ चव्हाण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महसूल विभागाचा खूप जूना इतिहास आहे. दिवसेंदिवस महसूल विभागाची रचना बदलत चालली आहे. महसूल विभागाचे महत्व ठिकवून ठेवले पाहिजे. सर्व क्षेत्रात काम करणारा महसूल विभाग हा शासनाचा कणा आहे, असे प्रतिपादन जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली… Continue reading महसूल विभाग शासनाचा कणा : सीईओ चव्हाण

बार्टी संस्थेच्या सहा तालुका समन्वयकांचा सत्कार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेत समाज कल्याण समितीची मासिक सभा पार पडली. या बैठकीमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त शाहू मिल येथे उभारण्यात आलेल्या समाज कल्याण विभागाच्या प्रचार प्रसिद्धी विभागात योजनांची माहिती देणाऱ्या बार्टी संस्थेच्या सहा तालुका समन्वयकांचा जिल्हा परिषदेचे प्रशासक संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. धनगरवाड्या व वस्तीवर कोण कोणता… Continue reading बार्टी संस्थेच्या सहा तालुका समन्वयकांचा सत्कार

सैन्य भरती प्रक्रियेस सर्व विभागांनी सहकार्य करावे : कवितके

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरमध्ये २२ नोव्हेंबर ते ११ डिसेंबर २०२२ दरम्यान होणारी सैन्य भरती प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी केले. जिल्ह्यात २२ नोव्हेंबर ते ११ डिसेंबर या कालावधीत अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्य भरती होणार आहे. या सैन्य भरतीमध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, उत्तर गोवा… Continue reading सैन्य भरती प्रक्रियेस सर्व विभागांनी सहकार्य करावे : कवितके

सुट्टीदिवशी वीज बिल भरणा केंद्र सुरु राहणार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ग्राहकांना वीज बिलाचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी जुलैअखेर शनिवार व रविवारी (३० व ३१ जुलै) सुट्टीदिवशी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महावितरणचे सर्व अधिकृत वीज बिल भरणा केंद्र सुरु ठेवण्याचे निर्देश मुख्य अभियंता परेश भागवत यांनी दिले आहेत. ग्राहकांना घरबसल्या महावितरणच्या मोबाईल ॲप किंवा www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर नेट बँकिंग, डेबिट किंवा… Continue reading सुट्टीदिवशी वीज बिल भरणा केंद्र सुरु राहणार

गगनबावडा तालुक्यात इच्छुकांच्या दांड्या गुल

साळवण (प्रतिनिधी) : गगनबावडा तालुक्यातील जिल्हा परिषदच्या दोन आणि पंचायत समितीच्या चार मतदारसंघांचे आरक्षण जाहीर झाले असून, जि.प. दोन्ही मतदारसंघातून सर्वसाधारण राखीव महिला असे आरक्षण पडल्यामुळे अनेक नवनिर्वाचित इच्छुक तरुणांची बत्ती गुल झालेली आहेत, तर काही नवीन महिलांना संधी मिळणार आहे. गगनबावडा तालुक्यातील पंचायत समितीच्या चार गणांपैकी तिसंगी येथील अनुसूचित जाती सर्वसाधारण, असंडोली येथील सर्वसाधारण… Continue reading गगनबावडा तालुक्यात इच्छुकांच्या दांड्या गुल

टोप, वाठारमध्ये पं. स. साठी महिलाराज

टोप (प्रतिनिधी) : टोप जिल्हा परिषद हा नवीन गट तयार झाला आहे. यामध्ये पहिल्यांदाच आरक्षण जाहीर झाले आहे. टोप जि.प.साठी सर्वसाधारण महिला हे आरक्षण जाहीर झाले असून, टोप व वाठार पंचायत समितीमध्येही महिलाच आल्याने अनेक इच्छुकांची निराशा झाल्याचे चित्र सध्या टोप, अंबप, वाठार, संभापूर परिसरात झालेचे चित्र दिसत आहे. नव्याने स्थापन झालेल्या या टोप जि.… Continue reading टोप, वाठारमध्ये पं. स. साठी महिलाराज

बसर्गे, हलकर्णी, महागाव, गिजवणेत महिलाराज

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या गटासह पंचायत समिती गणांचे आरक्षण आज घोषित करण्यात आले. गडहिंग्लजमधील पंचायत समितीच्या दहा गणांसाठीची आरक्षण सोडत नगरपालिकेच्या शाहू सभागृहात सकाळी काढण्यात आली. २००२ पासूनच्या चार वेळच्या आरक्षणाचा चक्राकार विचार होऊन प्राधान्य क्रमानुसार नेसरी गण अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाला, तर नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रीसाठी हसूरचंपू, आणि सर्वसाधारण महिलेसाठी महागावची चिठ्ठी… Continue reading बसर्गे, हलकर्णी, महागाव, गिजवणेत महिलाराज

error: Content is protected !!