आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष सज्ज : जिल्हाधिकारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, पोलीस, आरोग्य, जिल्हा परिषद, महापालिका इत्यादी सर्व महत्त्वाच्या यंत्रणांनी पावसाळा कालावधीमध्ये त्यांच्या विभागामध्ये पूर व्यवस्थापनाचा नियंत्रण कक्ष २४ तास सुरू केला आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या सोयीसाठी ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग, नद्यांची पाणीपातळी तसेच जिल्ह्यातील कोणते… Continue reading आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष सज्ज : जिल्हाधिकारी

जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करा : खा. महाडिक

कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्याची मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना खा. धनंजय महाडिक यांच्या वतीने देण्यात आले आहे. प्रादेशिक हवामान अंदाज केंद्र यांच्याकडील संदेशान्वये महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. कोल्हापूर जिल्हयात पुराचा धोका वाढलेला असून, जिल्हयात सध्या ५९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. अतिवृष्टीमुळे आपत्कालीन… Continue reading जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करा : खा. महाडिक

२० शहीद जवानांच्या वारसांना २ हेक्टर जमिनीचे वाटप

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील करवीर, शाहूवाडी, भुदरगड, आजरा, राधानगरी या तालुक्यातील एकूण २० शहीद वीर जवानांच्या कुटुंबीयांना त्या त्या तालुक्यातील प्रत्येकी २ हेक्टर जमीन शेती प्रयोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वाटप करण्यात आली आहे, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी किशोर पवार यांनी दिली आहे. भारतीय सैन्य दलात किंवा सशस्त्र दलामध्ये कार्यरत जवानास अथवा अधिकाऱ्यास कोणत्याही युध्दात, युध्दजन्य परिस्थितीत… Continue reading २० शहीद जवानांच्या वारसांना २ हेक्टर जमिनीचे वाटप

पूरबाधित क्षेत्राची उद्या राजेश क्षीरसागर पाहणी करणार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस कोसळत असल्याने पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली असून, सातत्याने पाणी पातळीत वाढ होत आहे. पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे उद्या शुक्रवार, दि. १५ जुलै रोजी संभाव्य पूरबाधित क्षेत्राची पाहणी करणार आहेत. पूरस्थितीत कोणकोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, आपत्कालीन यंत्रणांची सुसज्जता, आवश्यक वाढीव यंत्रणा आदींचा… Continue reading पूरबाधित क्षेत्राची उद्या राजेश क्षीरसागर पाहणी करणार

राज्यात पेट्रोल ५, डिझेल ३ रुपयांनी स्वस्त : मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात पेट्रोलच्या करात ५ रुपये आणि डिझेलच्या करात ३ रुपये कपात केल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज (गुरुवारी) रात्री १२ वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी मंत्रिमंडळ बैठक झाली. बैठकीत… Continue reading राज्यात पेट्रोल ५, डिझेल ३ रुपयांनी स्वस्त : मुख्यमंत्र्यांची घोषणा

सीईओ चव्हाण यांची संभाव्य पूरबाधित गावांना भेट

कुंभोज (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी संभाव्य पूरबाधित गावांना भेट देऊन विविध प्रकारच्या सूचना स्थानिक अधिकारी व ग्रामस्थांना केल्या. गतवर्षीच्या महापुरात सर्व प्रथम बाधित झालेल्या व यावर्षीही महापुराचा तडाखा बसू शकणाऱ्या हातकणंगले तालुक्यातील वारणा नदीच्या काठी असलेल्या निलेवाडी, जुनेपारगाव, नवे पारगाव, चावरे व घुणकी या पूरग्रस्त गावांना भेटी देऊन सर्व… Continue reading सीईओ चव्हाण यांची संभाव्य पूरबाधित गावांना भेट

जिल्हा प्रशासन मदत करण्यास सज्ज : अभियंता क्षीरसागर

कुंभोज (प्रतिनिधी) : महापुराच्या संभाव्य पार्श्वभूमीवर भेंडवडे, खोची येथे तालुका संपर्क अधिकारी व जि.प. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र क्षीरसागर यांनी भेट दिली. गावात कार्यरत असणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी सतत माहिती घेत अलर्ट राहून यंत्रणा सक्रिय ठेवली पाहिजे. कोणत्याही बाबतीत हलगर्जीपणा करू नये. जिल्हा प्रशासन सर्वतोपरी मदत करण्यास सज्ज आहे. एकमेकांना सहकार्याची भूमिका ठेवा,… Continue reading जिल्हा प्रशासन मदत करण्यास सज्ज : अभियंता क्षीरसागर

इचलकरंजी महापालिकेचा लौकिक वाढवणार : आयुक्त

इचलकरंजी : ताराराणी पक्षाच्या वतीने इचलकरंजी महापालिकेचे नूतन आयुक्त सुधाकर देशमुख यांची भेट घेऊन शहरातील पाणी आणि आरोग्य यांना प्राधान्य देऊन हे प्रश्‍न तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात आली. आयुक्त देशमुख यांनी प्राधान्याने सर्वच प्रश्‍न मार्गी लावणे आणि सर्व सुविधा पुरविण्यासह इचलकरंजी महापालिकेला लौकिक प्राप्त करुन देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही दिली. इचलकरंजी नगरपालिकेचे नुकतेच… Continue reading इचलकरंजी महापालिकेचा लौकिक वाढवणार : आयुक्त

जि.प. आणि पं.स. ची आरक्षण सोडत स्थगित

मुंबई : राज्यातील २५ जिल्हा परिषदा व २८४ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी देण्यात आलेला आरक्षण सोडत कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. राज्य निवडणूक आयोगाने ५ जुलै रोजीच्या पत्रान्वये संबंधित जिल्हा परिषदा व त्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दिला होता. स्थानिक… Continue reading जि.प. आणि पं.स. ची आरक्षण सोडत स्थगित

पूरस्थिती आढाव्यासाठी अधिकाऱ्यांच्या दौऱ्याचे नियोजन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यामध्ये अतिवष्टी व महापुरामुळे उद्भवलेल्या संकटकाळात जीवितहानी व आर्थिक हानी टाळण्याच्या दृष्टीने जिल्ह्यामधील गाव व तालुकास्तरावर करण्यात आलेल्या उपाययोजना या संदर्भात जिल्हाधिकारी राहुल रेखावार व मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी चार दिवसांमध्ये आढावा घेण्यासाठी दौऱ्याचे नियोजन केलेले आहे. हे करत असताना येणाऱ्या दिवसांमध्ये सर्व जिल्ह्याचा दौरा एकाच वेळी करणे अशक्य असल्याने… Continue reading पूरस्थिती आढाव्यासाठी अधिकाऱ्यांच्या दौऱ्याचे नियोजन

error: Content is protected !!