कोल्हापूर (प्रतिनिधी) : कावळा नाका परिसरातील बंद औषध दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यानी औषधांसह २ लाख ४९ हजारांचे साहित्य लंपास केले. याप्रकरणी नितीन देवदत्त उरुणकर (वय ५४, रा. न्यू शाहूपुरी) यांनी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नितीन उरुणकर यांचे कावळा नाका परिसरामध्ये औषध विक्रीचे दुकान आहे. 31 ऑगस्ट रोजी त्यांच्या बंद दुकानानाच्या शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. त्यांनी दुकानातील फ्रीज, सागवानी लाकडाचे साहित्य, खुर्च्या, औषधे आणि १० हजारांची रोकड, असा सुमारे २ लाख ४९ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी काल (शुक्रवारी) रात्री उशिरा अज्ञात चोरट्याचा विरोधात पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल झाली आहे.