यड्रावमध्ये गुरुदेव दत्त ग्रामविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ

इचलकरंजी (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ग्रामीण भागातील वातावरण तापू लागले आहे. यड्रावसह तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून प्रचाराला वेग येऊ लागला आहे. यड्रावमध्ये श्री गुरुदेव दत्त ग्रामविकास आघाडीने आपल्या उमेदवारांच्या प्रचाराला सुरवात केली. गावातील सर्व मंदिरामध्ये उमेदवारांनी आशीर्वाद घेऊन प्रचाराची सुरुवात केली. यावेळी जिल्हा बँकेचे माजी चेअरमन विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन… Continue reading यड्रावमध्ये गुरुदेव दत्त ग्रामविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ

श्रीपाद छिंदमला दणका : न्यायालयाकडून राज्य सरकारचा निर्णय कायम

औरंगाबाद (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक विधान करणाऱ्या श्रीपाद छिंदम याचे नगरसेवक पद रद्द करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. या निर्णयाविरोधात छिंदमने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हा निर्णय कायम ठेवला आहे. यामुळे छिंदमला मोठा दणका बसला आहे. अहमदनगर महापालिका आणि राज्य सरकारने तत्कालीन उपमहापौर श्रीपाद छिंदम… Continue reading श्रीपाद छिंदमला दणका : न्यायालयाकडून राज्य सरकारचा निर्णय कायम

आणखी एक भाजप आमदार अडचणीत : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नोटीस

मुंबई (प्रतिनिधी) : भाजप नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर पुण्यातील कोथरूडमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर आणखी एका भाजप आमदाराची आर्थिक गैरव्यवहार प्रकऱणी चौकशी होणार आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी २० दिवसांपूर्वी नोटीस पाठवली आहे. त्यामुळे लाड यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. लाड यांच्यावर २००९ मध्ये… Continue reading आणखी एक भाजप आमदार अडचणीत : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नोटीस

आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो : नामांतरावरून काँग्रेसचा शिवसेनेला इशारा

मुंबई (प्रतिनिधी) :  काँग्रेसचे मंत्री अमित देशमुख यांच्या खात्याच्या निर्णयात औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केला आहे.  काँग्रेसचा  औरंगाबादच्या नामांतरणाला विरोध असताना  मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असे केल्याने  महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करून नाराजी व्यक्त केली आहे.   बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान… Continue reading आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो : नामांतरावरून काँग्रेसचा शिवसेनेला इशारा

काँग्रेस नेत्याचा पुन्हा स्वबळाचा नारा : महाविकास आघाडीत वादाची चिन्हे

मुंबई (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांच्या नेत्यांकडून वारंवार राज्यातील सर्व निवडणुका एकत्रित लढविणार असल्याचा दावा केला जात असतो. मात्र मुंबई काँग्रेसचे नूतन अध्यक्ष भाई जगताप यांनी मात्र पुन्हा एकदा वेगळी भूमिका मांडली आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढविण्याचा माझा विचार आहे. मला १०० दिवसांनंतर जरी विचारले तरी मी ते सांगेन, असे त्यांनी स्पष्ट… Continue reading काँग्रेस नेत्याचा पुन्हा स्वबळाचा नारा : महाविकास आघाडीत वादाची चिन्हे

गडहिंग्लज तालुक्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू

गडहिंग्लज (प्रतिनिधी) तालुक्यात इतके दिवस फक्त निवडणुकीची चर्चा सुरू होती. आता अर्ज माघारीनंतर आता खऱ्या अर्थाने निवडणुकीला रंग चढू लागला आहे. तालुक्यातील सहा गावांनी आदर्शवत काम केले असून गावाची ग्रामपंचायत  बिनविरोध केली आहे. यामध्ये सावतवाडी, गिजवणे, तेगिनहाळ, चंदनकुड, येनेचंवडी, दुगुनवाडी या गावांचा समावेश आहे. आता उर्वरित गावात दुरंगी, तिरंगी लढती होत असून उमेदवारांचे पै पाहुणे,… Continue reading गडहिंग्लज तालुक्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू

पदवीधर निवडणुकीसंबंधी चंद्रकांतदादांचा गंभीर आरोप

मुंबई (प्रतिनिधी) : विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या निवडणुकीतील मतपत्रिकेवरून गंभीर आरोप केले आहेत. ‘मराठवाडा आणि पुण्यात मतदानादरम्यान मतपत्रिका या कोऱ्या होत्या, असा आरोप त्यांनी केला आहे. याबद्दल पुराव्यानिशी पत्रकार परिषद घेणार असल्याचे पाटील यांनी आज मुंबईतील पत्रकार परिषदेत… Continue reading पदवीधर निवडणुकीसंबंधी चंद्रकांतदादांचा गंभीर आरोप

‘मंत्रालय आपल्या दारी’ मोहिमेची सुरुवात कोल्हापुरातून ! : उदय सामंत

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील सर्वच विभागीय सहसंचालक कार्यालयातील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी ‘मंत्रालय आपल्या दारी’ अभियानाची सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यातून करावी, अशी सूचना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता यांना केली आहे.  कोल्हापूर येथील उच्च शिक्षण विभागांतर्गत विभागीय सहसंचालक कार्यालयामध्ये सुरू असलेल्या कामकाजाची गंभीर दखल घेत राज्यातील सर्व विभागीय सहसंचालक कार्यालयांच्या… Continue reading ‘मंत्रालय आपल्या दारी’ मोहिमेची सुरुवात कोल्हापुरातून ! : उदय सामंत

औरंगजेब तुमचा आदर्श आहे काय..? : शिवसेनेचा काँग्रेसला सवाल

मुंबई (प्रतिनिधी) : औरंगाबादच्या नामांतरावरून राजकीय वातावरण तापले असताना शिवसेनेने पुन्हा एकदा काँग्रेसला डिवचले आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी शिवसेनेने लावून धरली आहे. त्यास काँग्रेसने मोठा विरोध केला आहे. तर या मुद्द्यावरून भाजपने शिवसेनेची कोंडी केली आहे. यावर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. औरंगजेब तुमचा आदर्श आहे काय?,… Continue reading औरंगजेब तुमचा आदर्श आहे काय..? : शिवसेनेचा काँग्रेसला सवाल

मुंबईच्या महापौरांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई (प्रतिनिधी) : अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पोलिसांकडे दिली आहे. याप्रकऱणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. एका अज्ञात व्यक्तीने २१ डिसेंबरला महापालिकेच्या मुख्यालयात आपले खासगी सचिव यांना फोन केला. आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत आपल्याला जीवे… Continue reading मुंबईच्या महापौरांना जीवे मारण्याची धमकी

error: Content is protected !!