घरफाळ्याच्या तक्रारींसंदर्भात तत्काळ मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या घरफाळा विभागात घोटाळे झाल्याचे आरोप झाले आहेत. घरफाळा विभागाकडून नवीन इमारतींना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्याकरिता आणि घरफाळा लागू करण्याकरिता अवाजवी दंड आकाराला जात असल्याने घरफाळा आणि पूर्णत्वाच्या दाखल्याची हजारो प्रकरणे प्रलंबित आहेत. ती मार्गी लावण्यासाठी आणि घरफाळ्याबाबत तक्रारींच्या अनुषंगाने तत्काळ मार्गदर्शन शिबिरे आयोजित करावीत, घरफाळा दंड रकमेबाबत शासन निर्णयात सुधारणा करण्याकरिता… Continue reading घरफाळ्याच्या तक्रारींसंदर्भात तत्काळ मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करा…

कोल्हापुरातील रस्ते विकास प्रकल्पासाठी २०४ कोटींचा निधी मंजूर

मुंबई / कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) योजना नागरी दळणवळण साधनांचा विकासअंतर्गत कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या विकास प्रकल्पाकरिता २०३. ८२ कोटी रूपयांच्या निधीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली. दोन टप्प्यात हा निधी मिळणार आहे. यासाठी आ. चंद्रकांत जाधव, आ. ऋतुराज पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या… Continue reading कोल्हापुरातील रस्ते विकास प्रकल्पासाठी २०४ कोटींचा निधी मंजूर

महाविद्यालीन विद्यार्थ्यांसाठी ३० टक्के लस राखीव ठेवावी : ना. उदय सामंत

नांदेड (प्रतिनिधी)  : ज्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे लसीकरणाचे दोन डोस झाले असतील अशा विद्यार्थ्यांना घेऊन महाविद्यालये सुरू करण्याच्या निर्णयापर्यंत आम्ही पोहचलो आहे. तसेच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे लसीकरण व्हावे यासाठी जिल्ह्याला मिळणाऱ्या लस साठ्यांपैकी ३० टक्के लस विद्यार्थ्यांना राखीव ठेवल्यास ते लवकर शक्य होईल. त्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्याधिकारी, पोलीस अधीक्षक, महापालिका आयुक्तांच्या समितीने आम्हास निर्णय… Continue reading महाविद्यालीन विद्यार्थ्यांसाठी ३० टक्के लस राखीव ठेवावी : ना. उदय सामंत

जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा : प्रक्रिया सुरू करण्याचा सहकार विभागाचा आदेश

मुंबई / कोल्हापूर (प्रतिनिधी) : मागील दीड वर्षांपासून कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर विविध निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या. सहकार विभागाने ३१ ऑगस्टपर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्याचा आदेश काही महिन्यांपूर्वी दिला होता. आता मात्र जिल्हा सहकारी बँकांची निवडणूक प्रक्रिया सुरु करावी, असा आदेश आज (सोमवार) सहकार विभागाने दिला. त्यामुळे विविध जिल्ह्यातील बँकांसह कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या… Continue reading जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा : प्रक्रिया सुरू करण्याचा सहकार विभागाचा आदेश

पुरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींची तरतूद : मुख्यमंत्री

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील विविध जिल्हयात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात आज (मंगळवार) बैठक घेण्यात आली. यामध्ये पूरग्रस्तांसाठी मंत्रीमंडळाने ११ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.  यामधून मदत, पुनर्बांधणी आणि आपत्ती सौम्यीकरण यावर खर्च केला जाणार आहे.आपत्तीग्रस्त नागरीकांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरापेक्षा वाढीव दराने मदत करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. या निधीपैकी… Continue reading पुरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींची तरतूद : मुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली केली शिरोळ तालुक्याची पाहणी

शिरोळ (प्रतिनिधी) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे समवेत खासदार धैर्यशील माने यांनी शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करून पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पूरग्रस्त भागातील स्थलांतरित करण्यात आलेल्या जनावरांच्या चाऱ्याची प्रचंड मोठी समस्या तालुक्यामध्ये निर्माण झाली असून शासनाच्यावतीने या जनावरांना चारा उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार धैर्यशील माने यांनी अजित पवार यांच्याकडे केली. खा. माने… Continue reading उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली केली शिरोळ तालुक्याची पाहणी

पुणे-बंगळूर महामार्ग अद्यापही चार फूट पाण्याखाली

टोप (प्रतिनिधी) : कोल्हापुरात आलेल्या महापुरामुळे शुक्रवारी बंद झालेला पुणे-बंगळूर महामार्ग अद्यापही चार फूट पाण्याखाली आहे. पंचगंगेची पाणीपातळी ओसरत असली तरी पुणे-बंगळूर महामार्ग वाहतुकीसाठी पूर्ण बंद आहे. शिरोली एमअआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बुधले मंगल कार्यालय, पुणे -बेंगलोर हायवेवर दुतर्फा पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्याने दोन्ही बाजूंनी वाहतूक बंद करण्यात आली होती. तावडे हॉटेल कडून… Continue reading पुणे-बंगळूर महामार्ग अद्यापही चार फूट पाण्याखाली

दुपारी ‘एनडीआरएफ’च्या आणखी ४ तुकड्या दाखल होणार : पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी)  : सध्या पावसाचा जोर ओसरला असला तरी पंचगंगा नदी अजून २०१९ सालच्या सर्वोच्च पातळीवर वाहत आहे . या पार्श्वभूमीवर लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासह मदत आणि बचाव कार्यासाठी NDRF च्या आणखी ४ तुकड्या कोल्हापूर जिल्ह्यात दाखल होणार आहेत. दुपारी हवाई मार्गाने कोल्हापूर विमानतळावर या तुकड्या दाखल होतील अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी ट्विटद्वारे… Continue reading दुपारी ‘एनडीआरएफ’च्या आणखी ४ तुकड्या दाखल होणार : पालकमंत्री सतेज पाटील

‘त्या’ दोन्ही गरोदर महिलांसाठी आपत्कालीन यंत्रणा ठरली ‘देवदूत..!

गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील तिरवडे येथे आज दुपारपासूनच एका गरोदर महिलेच्या प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. तिला गारगोटीत दवाखान्यात आणल्याशिवाय पर्याय नाही. पण गारगोटीपर्यँतच्या दहा किलोमीटर अंतरात वेदगंगा नदीचे पाणी दोन ठिकाणी रस्त्यावर आलेले असलेने तिला दवाखान्यात न्यायचे कसे? हा प्रश्न समोर ठेवून घरचे नातेवाईक हवालदिल झाले होते. अशा प्रसूतीच्या वेदनेने व्याकुळ झालेल्या आणि हवालदिल… Continue reading ‘त्या’ दोन्ही गरोदर महिलांसाठी आपत्कालीन यंत्रणा ठरली ‘देवदूत..!

पालकमंत्री सतेज पाटील यांनी घेतला विस्थापितांचा आढावा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हा व शहरामध्ये स्थलांतरीत झालेल्या नागरिकांचा, कोल्हापूर डिझाइस्टर मॅनेजमेंटच्या सदस्यांसमवेत जिल्हा परिषदेमध्ये आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी राहूल रेखावार, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, माजी जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उप‍जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे… Continue reading पालकमंत्री सतेज पाटील यांनी घेतला विस्थापितांचा आढावा

error: Content is protected !!