प्रामाणिकपणाबद्दल यांचा केला सत्कार

पंढरपूर प्रतिनिधी- येथील श्री संत तुकाराम भवनच्या परिसरात एका विठ्ठल भक्तास एक सोन्याची चेन सापडली त्या वेळी येथे कर्तव्यावर हजार असणारे मंदिर सुरक्षा सहाय्यक फौजदार श्री विठ्ठल यल्लप्पा शिंदे यांनी ती पाहिली व तात्काळ श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे माहिती केंद्र येथे माहीती देऊन तात्काळ स्पिकरवरून सदर गहाळ सोने चैन सापडली आहे ओळख पटवून ती… Continue reading प्रामाणिकपणाबद्दल यांचा केला सत्कार

विठ्ठल रुक्मिणी मंदीरे समितीस ५ लाख रुपये देणगी

पंढरपूर प्रतिनिधी- पुणे जिल्यातील शिरूर येथील भिमाजी जनजी जासूद यांनी शुक्रवारी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीरे समितीस ५ लाख रुपये देणगीचा धनादेश दिला. त्यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते श्री भिमाजी जासूद यांचा सत्कार “श्री” प्रतिमा, उपरणे,श्रीफळ देऊन करण्यात आला. यावेळी मंदिर समितीचे कर्मचारी  उपस्थित होते.

रयत शिक्षण संस्था ही रयत सेवकांच्या कष्टातून नावारुपाला

पंढरपूर प्रतिनिधी- रयत शिक्षण संस्थेची निर्मिती ही बहुजन समाजातील मुलांना शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने झाली असल्याने बहुजन समाजातील अनेक दातृत्त्वाचे हात लागल्याने ही संस्था आकाराला आली. त्याग, निष्ठा, योगदान, श्रम यातूनच कोणत्याही संस्थेची निर्मिती आणि विकास होत असतो.रयत शिक्षण संस्थेला त्यागाचा आणि निष्ठेचा वारसा फुले, शाहू आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचार आणि… Continue reading रयत शिक्षण संस्था ही रयत सेवकांच्या कष्टातून नावारुपाला

कार व दुचाकी अपघातात पती-पत्नी ठार

भीषण अपघातात दुचाकीचे दोन तुकडे पंढरपूर प्रतिनिधी / उपरी तालुका पंढरपूर येथे दुचाकी व कार अपघातात सातारा जिल्यातील भाविक पती पत्नीचा जागीच मुत्यू झाला आहे. हा अपघात गुरुवारी दुपारी घडला. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचे अक्षरशः दोन तुकडे झाले. सध्या महाराष्ट्रमध्ये रस्त्याची कामे सुरु आहेत. त्यामुळे वेगावर नियंत्रण राहिले नाही. त्यामुळे अपघाताचे प्रमाण… Continue reading कार व दुचाकी अपघातात पती-पत्नी ठार

पंढरपूर श्रमिक पत्रकार संघ पदाधिकारी निवड

पंढरपूर प्रतिनिधी/ पंढरपूर येथे श्रमिकपत्रकार संघाच्या बैठकीत नुतन पदाधिकारी म्हणून अध्यक्ष समाधान गायकवाड, कार्याध्यक्ष मोहन डावरे, उपाध्यक्ष सचिन शिंदे, उपाध्यक्ष बजरंग नागणे, खजिनदार सावता जाधव, सचिव घनश्याम शिंदे यांची एकमतानी निवड करण्यात आली. 2022-23 सालासाठी नुतन पदाधिकार्‍यांच्या निवडी करण्यात आल्या. जेष्ठ मार्गदर्शक सिध्दार्थ ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक घेण्यात आली. यावेळी मावळते अध्यक्ष नवनाथ पोरे,… Continue reading पंढरपूर श्रमिक पत्रकार संघ पदाधिकारी निवड

पंढरपूर सबजेलचा लोकसहभागातून कायापालट 

 पंढरपूर प्रतिनिधी :- पंढरपूर तहसिल कार्यालयाच्या आवारात असलेल्या पंढरपूर सबजेलची स्वच्छता व  रंगरगोंटी तसेच कैद्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी व्यवस्थेसह आदी आवश्यक कामे लोकसहभातून केली असल्याची माहिती निवासी नायब तहसिलदार मनोज श्रोत्री यांनी दिली. पंढरपूर सबजेलमध्ये 7 कारागृह कोठड्या व दोन व्हरांडे  आहेत. या ठिकाणच्या  आतील व बाहेरील भिंतींना रंगरंगोटी, दरवाजांना रंग, जुन्या लाकडी फर्निचरमधून नवीन… Continue reading पंढरपूर सबजेलचा लोकसहभागातून कायापालट 

एकदा होऊन जाऊ द्या समोरासमोरची लढाई : दिलीप धोत्रे

सत्ताधाऱ्यांविरोधात अर्बन बँक बचाव समविचारी पॅनल मैदानात पंढरपूर / प्रतिनिधी पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी मंगळवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सर्वच्या सर्व जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले. याला तगडे आवाहन अर्बन बँक बचाव समविचारी पॅनलच्या वतीने देण्यात आले आहे. समविचारी पॅनलच्या… Continue reading एकदा होऊन जाऊ द्या समोरासमोरची लढाई : दिलीप धोत्रे

पंढरपूर अर्बन बँक निवडणूक

परिचारक गट व मनसे गटाकडून अर्ज दाखल पंढरपूर प्रतिनिधी पंढरपूर अर्बन को-ऑप. बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे आज परिचारक गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये श्री प्रशांत परिचारक, रजनीश कवठेकर, हरीश ताठे, सतीश मुळे, शांताराम कुलकर्णी, विनायक हरिदास, पांडुरंग घंटी, राजाराम परिचारक, ऋषिकेश उत्पात, गणेश शिंगण, अनंत कटप, अमित मांगले, व्यंकटेश कौलवार,… Continue reading पंढरपूर अर्बन बँक निवडणूक

RPI च्या आंदोलनाला यश

समाज मंदिराचे काम पूर्ण , समाज्या मध्ये आनंदाचे वातावरण पंढरपूर प्रतिनिधी / महाराष्ट्रामध्ये सर्वत्र रस्ता रुंदीकरणाची कामे सर्वत्र सुरु आहेत. या कामांतर्गत पंढरपूर ते सोलापूर हे रस्त्याचे काम करत असताना तुंगत येथील भीमनगर मधील भीमकट्टा व झेंडा बाधित झाला होता. त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पंढरपूर तालुक्याच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. यावेळी आमची… Continue reading RPI च्या आंदोलनाला यश

भूवैकुंठपंढरपूर विकास आराखडा जिल्हाधिकारी यांना सादर

पंढरपूर प्रतिनिधी- महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात असलेल्या मंदिर परिसरातील जागांवर दर्शन मंडप इमारत सुचवण्यात आलेले आहे यामध्ये आपत्ती व्यवस्थापन केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र पदस्पर्श दर्शन हॉल मुख्य दर्शन हॉल कर्मचाऱ्यांसाठी पार्किंगची सोय आदी बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे त्याचबरोबर जगद्गुरु संत तुकाराम महाराज भवन येथे बहुउद्देशीय हॉल डिझाईन युक्त असा सुविधायुक्त करावा तसेच दुसऱ्या मजल्यावर मंदिर… Continue reading भूवैकुंठपंढरपूर विकास आराखडा जिल्हाधिकारी यांना सादर

error: Content is protected !!