आता राज्यातील सिनेमागृह, नाट्यगृहे सुरु होणार

मुंबई  (प्रतिनिधी) : कोरोनाची दुसरी लाट राज्यात ओसरली आहे. या पार्श्वभूमीवर  राज्य सरकारने राज्यातील शाळा आणि धार्मिक स्थळे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आता राज्यातील सिनेमागृह सुरु करण्यासही सरकारने परवानगी दिल्याची माहिती समोर आली आहे. २२ ऑक्टोबरपासून सिनेमागृह आणि नाट्यगृहेही सुरु होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून कोरोना नियम… Continue reading आता राज्यातील सिनेमागृह, नाट्यगृहे सुरु होणार

…म्हणून करीना कपूरने केला होता सरोगसीचा विचार

मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर आज तिचा ४१वा वाढदिवस साजरा करत आहे. सिनेमांसोबतच करीना तिच्या खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत राहिली. सैफ अली खानसोबत लग्न असो किंवा मुलांची नावं करीनाच्या चर्चा कायमच रंगल्या. करीना यावर्षी दुसऱ्यांदा आई झाली आहे.   काही सेलिब्रिटींप्रमाणे करीनाला देखील आई होण्याआधी फिगर खराब होऊन याचा करिअरवर परिणाम… Continue reading …म्हणून करीना कपूरने केला होता सरोगसीचा विचार

वर्ल्ड हिपहॉप स्पर्धेसाठी के. युनिट डान्स स्कूलच्या विद्यार्थ्यांची निवड

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापुरातील  के. युनिट डान्स स्कूलच्या कलाकारांनी आपला झेंडा इंडीयन हिपहॉप या स्पर्धेत रोवला. ही अभिमानाची गोष्ट आहे. के. युनिट डान्स स्कूलच्या ९ विद्यार्थ्यांनी इंडियन हिपहॉप २०२१ या स्पर्धेत टॉप ६ मध्ये येऊन कोल्हापूरचे नाव उज्वल केले. त्यांची निवड वर्ल्ड हिप हॉप स्पर्धेसाठी झाल्याची माहिती नृत्य परिषद प्रमुख करण गायकवाड आणि जिल्हा अध्यक्ष… Continue reading वर्ल्ड हिपहॉप स्पर्धेसाठी के. युनिट डान्स स्कूलच्या विद्यार्थ्यांची निवड

मॅगी मिल्कशेक चाखणं दूर ;  पाहूनच पळाली नेटकऱ्यांची भूक

मुंबई (प्रतिनिधी) : दोन मिनिटांत होणारी आणि क्षणातच पोट भरणारी मॅगी म्हणजे ट्रेकला जाणाऱ्यांपासून बालमित्रांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा पदार्थ. संपूर्ण जगभरात मॅगीवर जीवापाड प्रेम करणारी मंडळी आहेत. मॅगीचं रुप एक असलं तरीही तिच्यापासून बहुविध पदार्थ तयार करण्याला अनेकांचीच पसंती असते. मॅगी पकोडा, मॅगी पराठा, एग मॅगी वगैरे वगैरे… पण तुम्ही कधी मॅगी मिल्कशेक हा पदार्थ ऐकलाय… Continue reading मॅगी मिल्कशेक चाखणं दूर ;  पाहूनच पळाली नेटकऱ्यांची भूक

जन्मदिनानिमित्त आशा भोसलेंच्या अवीट सुरावटींना उजाळा  

मुंबई (प्रतिनिधी) : आपल्या जादुई आवाजाने भारतीय रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या महान गायिका आशा भोसले यांचा आज जन्मदिवस. त्यांच्या गाण्यांच्या अवीट सुरावटी कित्येक वर्षांपासून श्रोत्यांच्या मनात  रूंजी घालत आहेत. केवळ एकाच प्रकारच्या गायकीत अडकून न पडता गाण्यांचे वेगवेगळे प्रकार त्यांनी लीलया हाताळले. त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्या गाण्यांचा आणि आशाताईंच्या व्यक्तिमत्वाचा घेतलेला हा आढावा… आशाताईंनी १९४३ मध्ये… Continue reading जन्मदिनानिमित्त आशा भोसलेंच्या अवीट सुरावटींना उजाळा  

‘केबीसी’मधील हॉट सीटवर बसणे रेल्वे अधिकाऱ्याला महागात

मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेला शो ‘केबीसी १३’ सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या शोमध्ये हॉट सीटवर रेल्वे अधिकारी देशबंधू पांडे बसले होते. परंतु आता त्यांना रेल्वे प्रशासनाने चार्जशीट दिली आहे. त्यांच्या वेतनवाढीवर तीन वर्षांसाठी बंदी घातली आहे. कोणतीही माहिती न देता गायब होणे आणि केबीसीमध्ये सहभागी होण्यासाठी पूर्व माहिती… Continue reading ‘केबीसी’मधील हॉट सीटवर बसणे रेल्वे अधिकाऱ्याला महागात

‘लागीरं झालं जी’मधील ‘शीतली’ चे छोट्या पडद्यावर पुनरागमन

मुंबई (प्रतिनिधी) : सोनी मराठी वाहिनीवर “कुसुम” ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला.  लागीरं झालं जी या मालिकेत भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी बावकर या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘शीतली’ या व्यक्तिरेखेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. आता सासर आणि माहेर अशा दोन्ही… Continue reading ‘लागीरं झालं जी’मधील ‘शीतली’ चे छोट्या पडद्यावर पुनरागमन

अभिषेक बच्चन रूग्णालयात : ऐश्वर्या रॉय तातडीने मुंबईत दाखल

मुंबई (प्रतिनिधी) : शुटिंगदरम्यान दुखापत झाल्याने बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर  अभिषेकचे वडील अभिनेते अमिताभ बच्चन आणि बहीण श्वेता बच्चन, अभिषेकची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. पण अभिषेकला नेमकी कोणती दुखापत झाली आहे? याबाबत काही समजू शकलेले नाही. अभिषेक बच्चन याला चित्रीकरणादरम्यान त्याच्या हाताला दुखापत… Continue reading अभिषेक बच्चन रूग्णालयात : ऐश्वर्या रॉय तातडीने मुंबईत दाखल

नात्याला विश्वास देणारी प्रेमकथा ‘जीव माझा गुंतला’    

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरी बाज असलेली ‘जीव माझा गुंतला’ ही मालिका १६ ऑगस्टपासून रात्री ८.३० वाजता कलर्स मराठी वाहिनीवर प्रक्षेकांच्या भेटीला आली आहे. यामध्ये अंतरा व मल्हारची गोड प्रेमकथा साकारली आहे. अंतरा तिचं कुटुंब चालवण्यासाठी रिक्षा चालवते. ती भावनिक अशी आणि नात्याला विश्वास देणारी आहे. अंतराची भूमिका साकारणारी अभिनेत्री योगिता चव्हाणने या मालिकेबद्दल सांगितले की,… Continue reading नात्याला विश्वास देणारी प्रेमकथा ‘जीव माझा गुंतला’    

काबुलमध्ये बनला ‘खुदा गवाह’ : विक्रम गोखलेंनी जागवल्या ‘त्या’ भयंकर आठवणी  

मुंबई (प्रतिनिधी) : अफगाणिस्तानमध्ये अराजकतेची परिस्थिती निर्माण झाली असून तालिबान्यांनी राजधानी काबुलवर कब्जा मिळवला आहे. राष्ट्रध्यक्ष यांच्यासह राजकीय नेत्यांनी देशातून पळ काढला आहे. तर नागरिक जीवाच्या आकांताने देश सोडून जावू लागले आहे. या विदारक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले  यांनी काबुलमध्ये केलेल्या एका चित्रपट शुटींगच्या भयंकर आठवणींना उजाळा दिला.            १९९२ मध्ये रिलिज… Continue reading काबुलमध्ये बनला ‘खुदा गवाह’ : विक्रम गोखलेंनी जागवल्या ‘त्या’ भयंकर आठवणी  

error: Content is protected !!