कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर अडीच वर्षाच्या कालावधीत एकही क्षण न थांबता विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी घेतलेल्या मेहनतीचे फळ म्हणून जनतेची ताकद आपल्या सोबत उभी राहिली. जनतेची ताकद आणि युवा सैनिकांची मेहनत या जोरावर यश मिळाले, आता त्याच ताकदिने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकातदेखील जास्तीत जास्त उमेदवारांच्या विजयासाठी तयारीला लागा, अशा सूचना युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी दिल्या.

विधानसभेतील विजयानंतर जनतेचे आभार मानण्यासाठी आणि युवा सैनिकांशी संवाद साधण्यासाठी लगेचच युवा सेनेच्या युवा विजय महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली होती. या अंतर्गत पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर,सांगली, सोलापूर या जिल्ह्यात युवा विजय महाराष्ट्र दौरा अंतर्गत विविध युवासेनेच्या शाखांची, आणि कॉलेज युनिट ची स्थापना तसेच युवकांचे भव्य मेळावे पार पडले. युवा सेनेच्या या दौऱ्यांमुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि सर्वत्र भगवा झंजावात निर्माण झाला, असे प्रतिपादन युवा सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांनी केले.

यावेळी बोलताना पूर्वेश सरनाईक यांनी युवा सेनेने घेतलेल्या मेहनतीच्या बळावर विधानसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे यश मिळाले, त्याचप्रमाणे आता कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत आपले जिवाभावाचे मित्र स्थानिक स्वराज्य संस्थां मध्ये पाठवण्यासाठी सज्ज व्हा. मतदार याद्यांचा अभ्यास करा. यासोबतच जास्तीत जास्त युवकांना युवा सेने सोबत जोडून रिक्त असलेल्या पदांवर तत्काळ पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करा. जनतेची सेवा करत असताना एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने सदैव कार्यरत असतात त्याप्रमाणेच सदैव कार्यरत रहा, अशा सूचना केल्या.

यावेळी युवा सेना मुख्य सचिव राहुल लोंढे,जिल्हाप्रमुख चेतन शिंदे, राकेश खोंद्रे,युवती सेना जिल्हाप्रमुख सलोनी शिंत्रे, विपुल भंडारे आदींनी मनोगते व्यक्त केली. मेळाव्याला सचिव किरण साळवी, मराठवाडा विभागाचे सचिव बाजीराव चव्हाण, संपर्कप्रमुख प्रसाद चव्हाण,जिल्हाप्रमुख निशिकांत पाटील,श्रीधर जकाते, युवती सेना जिल्हाप्रमुख सलोनी शिंत्रे,शहर प्रमुख मंदार पाटील, पियुष चव्हाण, विश्वदीप साळोखे, युवती सेना शहर प्रमुख नम्रता भोसले, तेजस्विनी घाटगे, सोशल मिडिया पश्चिम महाराष्ट्र समन्वयक सौरभ कुलकर्णी यांच्यासह युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित हॉते.