कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरातील सर्व वॉर्डामध्ये अंतर्गत रस्ते आणि ड्रेनेज लाईनची पायाभूत सुविधा निर्माण करून नागरिकांना सुविधा देण्यासाठी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक प्रयत्नशिल आहेत. त्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.या निधीतून विविध प्रभागातील कामे करण्यात येत आहेत. यातंर्गत कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ८ भोसलेवाडी कदमवाडीमध्ये रस्ता डांबरीकरणाचे काम करण्यात येणार आहे.त्यासाठी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर असून त्याचा शुभारंभ कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला.

खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शहराच्या विकासासाठी कटीबध्द असून शहराला पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात कमी पडणार नाही,अशी ग्वाही कृष्णराज महाडिक यांनी दिली. त्यानंतर प्रभाग क्रमांक ४५ मध्ये मंगळवार पेठेतील सुबराव गवळी तालीम पासून ते पद्मावती चौकापर्यंतच्या ड्रेनेज लाईनचे काम नगरोत्थान महाअभियानांतर्गत २० लाख रुपयांच्या निधीतून करण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभही कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते झाला.

त्याचप्रमाणं प्रभाग क्रमांक ७, सदर बाजार परिसरात मार्गांचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.त्याचा शुभारंभ महाडिक यांच्या हस्ते झाला. यावेळी संजय निकम, सुनील नाणिवडेकर, महावीर मंगदुम, अ‍ॅड. डी. बी. कापसे, एन.जी. पाटील आणि अजिंक्य तरुण मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान प्रभाग क्रमांक ६२ बुध्द गार्डन परिसरातील आयडीयल सोसायटीमध्ये अशोक साळोखे यांच्या घरापासून ते रेसिडेन्सि मित्र मंडळापर्यंतच्या मार्गावर गटार बांधकामासाठी २० लाख रुपये निधी देण्यात आला आहे. त्याचीही सुरूवात कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते झाली.

यावेळी माजी नगरसेवक संजय निकम, चंद्रकांत घाडगे, वैभव माने, उमेश माने, धीरज पाटील, किशोर पवार, प्रवीण वाघमारे, सोनल वाघमारे, पंकज किडगावकर, रणजित कांबळे, रविकिरण गवळी, प्रेम रजपुत, मोहन जाधव, मंगलताई निपाणीकर, राजू खडके,जय खडके,सुनिल देशपांडे,सनी आवळे आदी उपस्थित होते.