कळे (प्रतिनिधी) : आडुर, ता.करवीर येथे कुंभी नदीत मासे पकडताना जाळ्यात पाय अडकून पाण्यात बुडल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना आज शनिवारी सकाळी कुंभी परिसरात घडली. प्रवीण अशोक काटकर (वय ३७, रा.कळे, ता.पन्हाळा) असे त्यांचे नाव असून करवीर पोलिसात घटनेची नोंद झाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण काटकर हा शुटिंग व्हॉलीबॉल खेळाडू होता. आज तो मासे पकडण्यासाठी आडूर येथे तो कुंभी नदीत उतरला, नदीत आधीच कोणीतरी जाळे लावले होते. त्या जाळ्यात त्याचे पाय अडकल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती दिली.