कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर भुषण, शिवाजी विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य, 14 विक्रमी पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांच्या 6 व्या स्मृतीदिना निमित्त आंतरशालेय कला महोत्सव यसबा करंडक 2024 पर्व 3 रे आयोजित करण्यात येणार आहे. यावर्षीचा यसबा बालमित्र पुरस्कार कलाशिक्षक मिलिंद यादव यांना जाहिर झाला आहे. येत्या 14 डिसेंबरला विद्यार्थी विकास विभाग, शिवाजी विद्यापीठ आणि चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव राजमाता जिजाऊ सभागृह, शिवाजी विद्यापीठ येथे होणार आहे.

तब्बल 16 शालेय संघात हा कला महोत्सव बहरणार आहे. शालेय स्तरावर कलागुणांना मुक्त उधळण करण्याचे अंगण म्हणजे हे यसबा करंडक आहे. चित्रकला, मातीकाम,एकपात्री, निबंधलेखन,समूह गायन, समूह नृत्य अशा 6 कला प्रकारांमध्ये हा कला महोत्सव रंगणार असल्याची माहिती यसबा करंडकचे संकल्पक, दिग्दर्शक संग्राम यशवंत भालकर यांनी दिली आहे.

रंग यसबा, गंध यसबा कलाविष्कार मध्ये युवा गायक संग्राम पाटील, निखिल मधाळे, गायिका रूचा गावंदे, वैष्णवी गोरड ,हर्षदा परीट हे मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी येणार आहेत.

यावेळी फौंडेशनचे अध्यक्ष संदिप भालकर, उपाध्यक्ष सपना जाधव भालकर, संदिप जाधव, यसबा करंडक सदस्य भुषण पाठक, आशिष हेरवाडकर, आकाश लिगाडे, समर्थ जाधव, महेश चौगुले आदी उपस्थित होते.