निपाणी ( प्रतिनिधी ) : यमगरणी ग्रामपंचायतीकडून पंधरावा वित्त आयोग अंतर्गत मराठी मुलांची शाळा नांगणुर येथे हायटेक शौचालयसाठी पाच लाख रुपये आणि फेवर ब्लॉकसाठी दोन लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. या कामाचे उद्घाटन आज शाळेमध्ये करण्यात आले.
यावेळी सर्व ग्रामपंचायत अध्यक्ष आणि सदस्यांचा सत्कार ही शाळेकडून करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष नसीरखान इनामदार सरकार आणि ग्रामपंचायत सदस्य सागर चेंडके, महादेव कांबळे, सुनील पोवार, संभाजी पाटील तसेच एस.डी.एम.सीचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, माजी अध्यक्ष रणजीत पोवार, रमजान पठाण, सदस्या अनिता परीट, अमोल चेंडके शाळेचे मुख्याध्यापक जबडे सर तसेच सर्व शिक्षक विद्यार्थी विद्यार्थ्यांनी शिक्षिका आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Post Views: 144
