मुंबई : वरळी हिट अँड रन प्रकरणांमध्ये आरोपी मिहीर शहाचे वडील राजेश शहा यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. वरळी येथील दुर्घटनेत कावेरी नाखवा या महिलेला गाडीखाली चिरडणाऱ्या मिहीर शहायाला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मंगळवारी अटक केली. अपघात झाल्यानंतर मिहीर शहा फरार होता. मिहीरचे वडील राजेश शहा हे शिंदे गटाचे पालघर जिल्ह्यातील उपनेते आहेत. राजेश शहा यांनीच मिहीरला पळून जाण्यासाठी मदत केल्याने ते पोलिसांच्या रडारवर आले होते.

राजेश शहा यांची शिवसेना पक्षाचे उपनेते होते. वरळी हिट अँड रन प्रकरणानंतर राजेश शहा अडचणीत आले होते. राजेश शहा यांना मुलगा मिहीर शहाचे हिट अँड रन प्रकरण चांगलेच नडले आहे. पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शहा यांना उपनेते पदावरून पदमुक्त केलं आहे.