पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा येथील संजीवन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनमध्ये जागतिक सूर्यनमस्कार दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनींनी सूर्यनमस्कार घातले.
या जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना या सूर्यनमस्काराचे अर्थात योगाचे ही महत्व विशद करण्यात आले. यावेळी फॉरेन रिटर्न योगगुरु संजय हाके आणि तृप्ती मोहिते यांच्या उपस्थितीमध्ये सर्व विद्यार्थ्यांना सूर्यनमस्काराचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी सर्व विभागाचे वसतिगृह अधीक्षक उपस्थित होते.