मुंबई : जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांचे वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले आहे. रविवारी 15 डिसेंबरला त्यांनी अमेरिकेच्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. जगप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांना हृदयासंबंधीचा त्रास चालू होता. त्यामुळे त्यांना अमेरिकेतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. झाकीर हुसैन त्यांच्या निधनाच्या माहितीनंतर मनोरंजन, कला, राजकीय यासर्वातुन हळहळ व्यक्त होत आहे. उस्ताद झाकीर हुसेन हे एक भारतीय तबलावादक, संगीतकार दिग्दर्शक आणि तालवाद्यवादक होते.

झाकीर हुसेन ह्यांचा जन्म 9 मार्च 1951 रोजी मुंबई येथे राहणाऱ्या पंजाबी कुटुंबात झाला. हुसेन ह्यांची आई बावी बेगम आणि वडील सुप्रसिद्ध तबलावादक उस्ताद अल्लाह रखा आहेत. त्यांच्या कुटुंबाचे अडनाव कुरेशी असले तरीही झाकीर ह्यांना हुसेन हे आडनाव देण्यात आले. हुसेन ह्यांनी माहीम येथील सेंट माईकल्स हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतले होते. त्यानंतर त्यांनी सेंट झेवियर कॉलेज, मुंबई येथे देखील शिक्षण घेतले होते. त्यांच्या वडिलांनी हुसेन ह्यांच्या वयाच्या तिसऱ्या वर्षापासून पखवाज शिकवायला सुरुवात केली होती. त्यांना 1988 साली, भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार आणि 2002 साली, पद्म भूषण पुरस्कार राष्ट्रपती अब्दुल कलाम ह्यांच्या हस्ते मिळाला. त्यांना 1990 साली संगीत नाटक अकादमी पुरस्कारानी सन्मानित केले गेले होते.

पदवीचे शिक्षण घेत असतानाच ते तबलावादनामुळे देशभरात ओळखले जाऊ लागले. फक्त 11 वर्षांचे असताना झाकीर हुसैन यांनी अमेरिकेत एक कार्यक्रम सादर केला होता. त्यांनी तबलावादनासोबतच चित्रपट क्षेत्रातही मोठे काम केले होते. त्यांनी एक 12 चित्रपट केले होते. त्यांना 1988 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. 1990 त्यांना संगीत नाट्य अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित केले गेले. या वर्षी इंडो-अमेरिकन संगितात दिलेल्या योगदानामुळे त्यांना सन्मानित केले गेले होते. 1992 साली त्यांना ‘प्लॅलेनेट ड्रम अल्बम’साठी बेस्ट वर्ल्ड म्युझिक कॅटेगिरीत ग्रॅमी अवॉर्ड मिळाला आहे. हा त्यांच्या करिअरमधील पहिला ग्रॅमी अवॉर्ड होता. हा पुरस्कार मिळाला तेव्हा ते अवघे 41 वर्षांचे होते. 2002 साली त्यांना पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 2023 साली केंद्र सरकारने त्यांना पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.