कोल्हापूर (प्रतिनिधी) : घरगुती वादातून झालेल्या मारहाणीत एक महिला जखमी झाली. हिना शाहरुख महात (वय २२, रा. बालिंगा, ता. करवीर) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी सात जणांविरुद्ध लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हिना महात या घरगुती कामानिमित्त गंगावेश येथे आल्या होत्या. दरम्यान, शाहरुख पापा महात (वय २७, रा. सांगली) याच्यासह सात जणांनी कौटुंबिक वादातून हिना महात यांना बेदम मारहाण केली. तसेच महात यांच्यासोबत असलेले नातेवाईक शबा जरेकर आणि बिलाल जरेकर यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी, हिना महात यांनी शाहरुख महात, पापा बाबालाल महात (दोघे रा. सांगली) इब्राहिम मौला जमादार, फारुख मौला जमादार, उमर मौला जमादार (तिघे रा. कुरुंदवाड, ता. शिरोळ) तसेच समीर शमशुदिन मुजावर (रा. बिंदू चौक) आणि अब्दुल अमीन कुरेशी (रा. मुक्त सैनिक वसाहत) यांच्याविरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.