मुंबई – दिवाळी म्हटलं की, बारामतीत पवार कुटुंबीय एकत्रित येण्याचा क्षण असतो. मात्र आधी लोकसभा आणि आता विधानसभेत पवार कुटुंबियांत राजकीय कटुता निर्माण झाली आहे. त्यामुळं आता या दिवाळीत पवार कुटुंबीय एकत्रित येतील का? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांना याबाबत विचारलं असता आपल्याला दिसेलचं, असं म्हणत त्यांनी स्पष्टपणे बोलणं टाळल्याचं दिसून आलं.

काय म्हणाले अजित पवार..?

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः नाना काटे यांची मनधरणी करण्यासाठी त्यांच्या घरी पोहचले चर्चेनंतर जेव्हा ते जाण्यासाठी निघाले तेव्हा, माध्यमांशी अजित पवारांनी संवाद साधला त्यावेळी, सुप्रिया सुळे असं म्हणताच भाऊबीजबद्दल पत्रकार विचारतील हे हेरून दादांनी काढता पाय घेतला अजित पवार म्हणाले “मी महायुतीचा जबाबदार व्यक्ती आहे. प्रत्येकाच्या बद्दल बोलणार नाही. 20 तारखेपर्यंत एकोपा ठेवायचा आहे. यावर मी उत्तर देणार नाही. आम्हाला महायुतीचा सरकार आणायचं आहे”, असं अजित पवार म्हणाले. यावेळी अजित पवारांना बारामतीत पवार कुटुंब एकत्र दिसणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “ते आपल्याला दिसेल”, अशी प्रतिक्रिया दिली.