कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांनाच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींची प्रतिक्षा लागून राहिली आहे. आज या निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे आज दुपारी ४ वाजता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात पत्रकार परिषद घेणार आहेत. या परिषदेतच नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुकींच्या तारखांची अधिकृत घोषणा करतील, अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका तीन टप्प्यांत घेतल्या जातील.
पहिला टप्पा : राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका.
दुसरा टप्पा : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका.
तिसरा आणि अंतिम टप्पा : महानगरपालिका निवडणुका.
