कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहेत.  राजकीय नेते प्रचार दौरे, मेळावे घेत  आहेत. अश्यातच कोल्हापूर उत्तर मधील कॉंग्रेसची उमेदवारी डावलेल्या राजेश लाटकर यांची समजूत घालण्यासाठी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून योजना आखली जात असल्याची माहिती समोर येत आहे.

त्याचबरोबर,  लाटकर यांनी अपक्ष भरलेला  उमेदवारी अर्ज मागे घेऊन मदत केली तर त्यांना भविष्यात महामंडळाची किंवा महानगरपालिका पातळीवर सक्षम नेतृत्व तयार करण्याची जबाबदारी देण्याबद्दलची माहिती समोर येत आहे. लाटकर यांची  समजूत काढण्यासाठी आ. सतेज पाटील यांनी फोनवरून त्यांच्याशी  चर्चा केली आहे.

याचदरम्यान, राजेश लाटकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज  भरलेला असला तरी,  त्यांनी कॉंग्रेससोबत राहणार  नाही,असे जाहीर केलेले नाही. कॉंग्रेससोबत राहणार की आलेली ऑफर  स्वीकारणार हे येत्या  गुरुवारी आ. सतेज पाटील यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीतच समजणार आहे.