कोल्हापूर (प्रतिनिधी) : मी सर्व कार्ये प्रामाणिक आणि पारदर्शीपणे करण्याबरोबरच लाच घेणार नाही, आणि लाच देणार नाही, अशी शपथ महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतली.
दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त आज (मंगळवार) महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ महापौर निलोफर आजरेकर, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे आणि स्थायी समिती सभापती सचिन पाटील यांनी दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितिन देसाई, उपआयुक्त निखिल मोरे, सहायक आयुक्त चेतन कोंडे, मुख्य लेखापरिक्षक धनंजय आंधळे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावार, अग्निशमन अधिकारी रणजित चिले यांच्यासह सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी भ्रष्टाचार निर्मूलनाची घेण्यात आलेली शपथ अशी – मी जीवनाच्या सर्व क्षेत्रात आणि कायद्याच्या नियमांचे पालन करेन. लाच घेणार नाही आणि लाच देणार नाही. सर्व कार्ये प्रामाणिक आणि पारदर्शीपणे करेन.जनहितामध्ये कार्य करेन. व्यक्तिगत वागणूकीत प्रामाणिकपणा दाखवून उदाहरण प्रस्तुत करेन आणि भ्रष्टाचाराची कोणत्याही घटनेची माहिती योग्य एजन्सीला देईन.