मुंबई (प्रतिनिधी) : बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व आता अंतिम टप्प्यात आलं असून निक्कीने फिनालेमधील पहिली जागा मिळवली आहे. आता उर्वरित सदस्यांपैकी बिग बॉस मराठीच्या रेस टू फिनालेमध्ये कोण कोण जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

आजचा भाग प्रेक्षकांसाठी खास का असणार आहे..?


आज बिग बॉस च्या घरात ‘आपला माणूस’ शिव ठाकरे स्पेशल गेस्ट म्हणून जाणार आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासातात पहिल्यांदाच ग्रँड सेलिब्रेशन तर होणारचं आहे त्यासोबत आजच्या भागात प्रेक्षकांना खास पहायला मिळणार आहे.

बिग बॉस काय म्हणाले..?

कलर्स मराठीने बिग बॉसचा एक प्रोमो शेअर केला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसून येत आहे की, ‘बिग बॉस’ म्हणत आहेत , ‘आपल्या प्रसिद्धीचा कुठलाही बडेजाव न करता, सगळ्यात मिळून मिसळून वागणारा, कधी गाणी गाऊन मंत्रमुग्ध करणारा अभिजीत सावंत’ ‘बिग बॉस मराठी’च्या या पर्वातील ग्रँड सेलिब्रेशनमध्ये होणारं कौतुक ऐकून अभिजीतचे डोळे पाणावले. प्रोमोमध्ये अभिजीत म्हणतोय की ‘या शोने खूप काही दिलंय’.

नेटकऱ्यांचा अंदाज खरा ठरणार का..?


बिग बॉस मराठीच्या घरात अभिजीत सावंतने प्रवेश करताच पहिल्याच दिवसांपासून नेटकऱ्यांनी अभिजीत सावंत विजेता होणार, असा अंदाज वर्तवला होता. मात्र, आता काही क्षणच दूर असल्यामुळे नेटकऱ्यांचा हा अंदाज खरा ठरतोय की काय हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. कलर्स मराठीने शेअर केलेल्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी, ‘आपला माणूस अभिजित सावंत’, ‘खरा विजेता अभिजीत सावंत’, ‘अभिजीतच जिंकणार’ अशा कमेंट्स केल्या आहेत.