कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी केलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीत संताप व्यक्त केला गेला आहे. माझ्यासारख्या अल्पसंख्याकांच्या मागे का लागलात? या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीत नुकतेच पक्षप्रवेश केलेल्या समरजितसिंह घाटगेनी मुश्रिफांवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे.
मुश्रीफांनी शरद पवारांवर कोणता आरोप केला ..?
मुश्रीफ यांनी शरद पवार यांच्यावर जातीवाचक आरोप केला असून या वक्तव्याचा मी निषेध करतो असं समरजित घाटगे म्हणाले. ज्या व्यक्तीने तुम्हांला सर्व पदे दिली तेंव्हा त्यांना अल्पसंख्यांक म्हणून विषय नव्हता का? महाराष्ट्र तुम्हांला माफ करणार नाही. पुरोगामी विचांराची चळवळ तुम्हाला माफ करणार नाही. शरद पवार आले, सभा घेतली त्यांनी आपले विचार मांडले तुम्ही त्यांच्यावर आरोप करण्याचे धाडस करत आहात असे घाटगे म्हणाले.
घाटगे यांनी पुढे असंही सांगितलं की, काही दिवसांपूर्वी बोलले होते की घाटगे यांना महत्त्व देण्याचा संबंध नाही असे मुश्रीफ म्हणाले. त्यावर घाटगे म्हणाले की , मला काही काळजी करण्याची गरज नाही. कागलची स्वाभिमानी जनता आहे, माझी पाठराखण करणार आहे. त्याचबरोबर माझ्या मागे शरद पवार यांचा आशीर्वाद आहे. अशा बऱ्याच धमक्या त्यांनी मला आधी दिल्या आहेत. मी त्यांच्या गोष्टींना फारसे सिरीयस घेत नसल्याचही घाटगे म्हणाले.
ते नेहमीच जातीचे कार्ड वापरतात, ईडीच्या छाप्यानंतरही त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यावेळी सुद्दा त्यांनी मी अल्पसंख्यांक असल्याने मला टार्गेट केलं जात असल्याचे सांगितले होते, पण नंतर त्यांनी काय केलं हे सर्वांना माहिती आहे. शरद पवार यांच्यावर जातीचा आरोप करत आहेत तो चुकीचा आहे. राजाविरुद्ध प्रजा असं म्हणत असाल तर 2009 ला संभाजी राजे छत्रपती देखील लोकसभेला उभारले होते.
जर तुम्ही तसे म्हणत असाल तर 2009 ला ठरवून संभाजी राजे छत्रपती यांचा आतून पराभव केला. त्यांनी मला टार्गेट केला आहे. माझ्या पत्नीला देखील टार्गेट केला आहे. परवा त्यांच्या सांगण्यावरून कार्यकर्त्यांनी आईसाहेबांना देखील टार्गेट केला आहे. विरोधकांच्या कोणत्याही टीकाटिपणीवर आम्ही विरोध करणार नाही. त्यांच्या अशा या वक्तव्यामुळे कागलचे नाव खराब होत आहे. कृपया मुश्रीफ यांनी कागलची बदनामी करू नये, असा टोलाही घाटगेंनी लगावला आहे.