International Dance Day 2024
: नृत्य (dance ) म्हणल की आपल्या चेहऱ्यावर एक स्माईल येत. नृत्य हे एक अशी गोष्ट आहे जी लहानापासून मोठ्या पर्यंत करायला आवडते. ते करताना एक वेगळा आनंद आपल्याला मिळते एक प्रकारचे समाधान मिळते. भले ही ते नृत्य स्टेजवरच असो, बेडरूम मध्ये हेडफोन केलेले असो अथवा गणपतीमध्ये केलेला डान्स असो. नृत्य करताना एक वेगळा आनंद अनुभवाला मिळतो. पण तुम्हाला माहिती आहे का या नृत्याची सुरुवात कधी व कशी झाली ते? चला आज आपण जाणून घेऊयात.
दर वर्षी 29 एप्रिल रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय नृत्य दिन साजरा केला जातो. 1982 पासून हा दिन साजरा करण्यात येतो. नृत्याच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करणे आणि नृत्याकडे लोकांचे लक्ष वेधणे हा या दिनाचा मुख्य हेतू आहे.. जगभरातील नर्तकांना प्रोत्साहन द्यावे लागेल. या दिवशी नृत्याशी संबंधित विविध कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन केले जाते. कथ्थक, भरतनाट्यम, हिप हॉप, बॅले, सालसा, लावणी असे अनेक नृत्यप्रकार जगभरात लोकप्रिय आहेत.महान नृत्यांगना जीन जार्ज नावेरे यांच्या वाढदिवशी त्यांच्या स्मृतीत हा उत्सव साजरा केला जातो.
आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाचा इतिहास
यूनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय थिएटर संस्थेची आंतरराष्ट्रीय नृत्य समितीने 29 एप्रिल 1982 रोजी आंतरराष्ट्रीय नृत्य दिन साजरा करण्याची घोषणा केली. हा दिवस निवडण्याचे मुख्य कारण म्हणजे नृत्य जगातील सुधारक मानल्या जाणार्या महान नर्तक जीन जॉर्ज नावेरे यांचा वाढदिवस आहे. 29 एप्रिल रोजी नावेरे यांचा जन्म झाला होता म्हणून दर वर्षी जगभरात आंतरराष्ट्रीय नृत्य दिन साजरा केला जातो. नावेरे यांनी नृत्यावर पुस्तक देखील लिहिले होते, ज्याचं नाव ‘लेटर्स ऑन द डांस’ आहे. या पुस्तकात नृत्य कलेच्या सर्व युक्त्या शिकवल्या गेल्या आहेत, ज्याद्वारे लोक करु शकतात किंवा नृत्य मध्ये प्रवीणता प्राप्त करू शकता.
काय आहे आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाचं महत्व..?
आनंदी जीवन जगण्यासाठी विविध कला प्रकार आयुष्यात रंग भरतात. त्यामुळे मानवी जीवनात नृत्याला मोठं महत्वाचं स्थान आहे. नृत्य हा संस्कृतीचा वारसा जपण्यात महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे नृत्य हा केवळ कला आणि अभिव्यक्तीचा प्रकार नसून त्याचे अनेक शारीरिक आणि मानसिक फायदे आहेत, असं या क्षेत्रातील तज्ज्ञांचं मत आहे. नृत्य तणाव कमी करण्यास मदत करते. त्यासह हृदय आणि र्कवाहिन्यांसंबंधी आरोग्य सुधारण्यास मदत करते. जीवनात नृत्याचे महत्व वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस महत्वपूर्ण आहे. जागतिक नृत्य दिन साजरा केल्यानं नागरिकांमध्ये नृत्याच्या महत्त्वाबद्दल जागरुकता निर्माण होते. नागरिकांना या कला प्रकारात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केलं जाते. नृत्याचं सांस्कृतिक महत्त्व जगभरात कसं विकसित झालं, यावर प्रकाश टाकते. जागतिक नृत्य दिवस नागरिकांना एकत्र आणण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावते.
भारतातील नृत्य परेदशात बॉलिवूड डान्सच्या बहाण्याच का नसो पण प्रसिद्ध आहे. क्लासिक डान्ससह महाराष्ट्राची लावणी, पंजाबी भांगडा, गुजराथी गरबा, राजस्थानी नृत्य अशा अनेक प्रकाराचे पारंपारिक नृत्य जगभरात प्रसिद्धी मिळवत आहे.