मुंबई : आज भारतीय नौदल दिन दरवर्षी 4 डिसेंबरला संपूर्ण भारतात साजरा केला जातो. भारतीय नौदलाच्या कामगिरीची आणि देशासाठीची भूमिका ओळखण्यासाठी प्रत्येक वर्षी 4 डिसेंबरला भारतात नौदल दिन साजरा केला जातो. 1971 मध्ये 4 डिसेंबर हा दिवस म्हणून निवडला गेला होता. तर ऑपरेशन ट्रायडंट वेळी भारतीय नौदलाने पाकिस्तानी नौदलाचा पराभव करत पीएनएस खैबरसह चार पाकिस्तानी जहाजे बुडवली होती. म्हणुन या दिवशी 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात शहीद झालेल्यांच्या स्मरणात दिवस साजरा केला जातो. भारतीय नौदल दिन हा दिवस भारतीय नौदलाचे सामर्थ्य धैर्य आणि देशासाठी समर्पणाचे प्रतीक आहे.भारतीय नौदलाच्या या भूमिकेचा सन्मान करणे हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे.

भारतीय नौदल दिनाचा इतिहास…

भारतीय नौदल दिन साजरा करण्याची सुरुवात मे 1972 मध्ये झालेल्या वरिष्ठ नौदल अधिकाऱ्यांच्या परिषदेमध्ये झाली. जेव्हा 4 डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 4 डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिन साजरा करण्याचे कारण 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाशी संबंधित आहे. या युद्धात पाकिस्तानने 3 डिसेंबरला भारतीय विमानतळावर हल्ला करण्यात आला होता.त्याला प्रत्युत्तर देत भारतीय नौदलाने 4 आणि 5 डिसेंबरच्या रात्री ऑपरेशन ट्रायडेंट राबवले गेले होते.

या मोहिमेत भारतीय नौदलाने पाकिस्तानी नौदलाचे मोठे नुकसान केले होते आणि शेकडो पाकिस्तानी नौदलाचे जवान मारले होते. या महान विजयाच्या स्मरणार्थ 4 डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. भारतीय नौदल 1612 मध्ये अस्तित्वात आली होती. जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीने रॉयल इंडियन नेव्ही नावाची नौदल तयार केली होती. ईस्ट इंडिया कंपनीने व्यापारी जहाजांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने नौदल दलाची स्थापना करण्यात आली होती.