मुंबई:आपल्या सर्वांचा लाडका साउथ सुपरस्टार सूर्या आता हिंदी चित्रपटामध्ये भूमिका करणार असल्याची माहिती समोर आली आहे. सूर्याचे साउथ चित्रपट खूप गाजले आहेत.सूर्याचा चाहता वर्ग खूप मोठा आहे.

जय भीमनंतरही साऊथ सुपरस्टार सूर्याची चलती आहे.आता त्याला प्रसिद्ध फ्रेंचाईजी धूम ४ चित्रपटाच्या विलेनसाठी सूर्याला विचारले गेले आहे असे समजले गेले आहे.आतापर्यंत कोणतीही पक्की माहिती समोर आलेली नाही.तर अभिषेक बच्चनच्या व्हायरल फोटोंनी धूम ४ च्या चर्चेने अधिक गती पकडली आहे.चाहत्यांना आतुरता लागली आहे.

विलेनच्या भूमिकेत सूर्या……

 धूम-४ साठी निर्माता तमिळ अभिनेता सूर्याशी बोलणे चालू असल्याची माहिती समोर आली आहे.सूर्या निगेटिव्ह म्हणजेच व्हिलन ची भूमिका करणार असल्याची माहिती समोर आली आहे.या चित्रपटात कोणकोणते कलाकार दिसणार आहेत हे अद्याप समजलेले नाही.जर सूर्याने धूम-४ साठी होकार दिला तर त्याच्या चाहते खुश होतील.

अक्षय कुमार-सुधा कोंगरा प्रसाद यांच्या ‘सरफिरा’ चित्रपटामध्ये सूर्या कॅमियो रोल साकारताना दिसणार आहे. मागील काही वेळेत धूम-४ विषयी वृत्त समोर आले आहे. यशराज फिल्म च्या धूम फ्रेंचायजीला पुढे नेण्यासाठी प्लॅनिंग करत असल्याच समोर येत आहे.धूम मागील चित्रपट 2013 ला रिलीज झाला होता. यामध्ये आमिर खान नकारात्मक भूमिका करताना दिसला होता.कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.