मुंबई : बिग बॉस शो सध्या खुप चर्चेत आहेत. तर बिग बॉस 18 सलमान खानमुळे शो खुप चर्चेत आलेला आहे. गेले 2 महिने ऑक्टोबरपासुन शो सुरू झाला आहे. तर या शोमध्ये सध्या चाहत पांडे, विवियन डिसेना, करण वीर मेहरा, शिल्पा शिरोडकर, कशिश कपूर, रजत दलाल, चुम दरंग, अविनाश मिश्रा असे अनेक स्पर्धक दिसत आहेत. तर बिग बॅासमध्ये प्रत्येक दिवशी रोज नवीन ड्रामा पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या 18 या सीझनला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिल्या असल्याचे पाहायला मिळत आहे. तर हा सीझन सगळ्या सीझनपैकी एक असल्याचेही म्हटले जात आहे.
या सीझनचा विजेता कोण होणार याविषयी देखील माहिती सध्या समोर येत आहे. या सीझनच्या वीकेंडचा वारही खूपच मनोरंजक होत असल्याचं सांगण्यात येत आहे. पण सर्व एपिसोड सलमान खानने होस्ट केलेले नाहीत. फराह खान,रवी किशन,अनुराग कश्यप यांसारख्या पाहुण्यांनी देखील हा शो होस्ट केला आहे. आजकाल करण वीर मेहरा आणि चुम दरंग यांची मैत्री चर्चेत आलेली दिसत आहे. हे दोघे पण शोच्या सुरुवातीपासूनच मित्र होते आणि खूप जवळ आले होते.
पण बिग बॉस शो आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे बोलले जात आहे. तर बिग बॅास शो पुढच्या एका महिन्यात संपणार असल्याची शक्यता आहे. तर शोचा ग्रँड फिनाले तारीख देखील समोर आली आहे. हा ग्रँड फिनाले 19 जानेवारीला होणार आहे. तर या शोला भरभरून प्रेम मिळत आहेत. जर या शोचा ग्रँड फिनाले 19 जानेवारी रोजी होणार असला तरी चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी केवळ एकच महिना राहिला आहे. बिग बॉस 18 च्या फिनालेची तारीख 19 जानेवारी नसून 8 किंवा 15 फेब्रुवारी देखील असू शकते.