कोल्हापूर (असित बनगे ) : आज काल जाती धर्मात तेढ निर्माण होत असताना, काही समाजकंटकांकडून हिंदू मुस्लिम ऐक्यात खोडा घालण्याच काम चालू असताना जाती धर्माला फाटा देण्याच काम कोल्हापुरातील दोन मित्र करत आहेत.

आज मोठ्या जल्लोषात घरगुती गणपती बाप्पाच आगमन झालंय. यातच विशेष म्हणजे कोल्हापुरात राहणारे बादशाह फरास हे मुस्लिम धर्मीय आणि अमर जगताप हे हिंदू धर्मीय असणारे दोन मित्र आजच्या पिढीला आदर्श घालून देत आहेत. गेली 40 ते 45 वर्षे जाती भेदाला फाटा देत हे दोघे मित्र गणेश उत्सव थाटामाटात साजरा करतात .गेली 40 ते 45 वर्षे हे दोघे जिवलग मित्र गणेशोत्सव प्रमाणे ईदही मोठ्या उत्साहात साजरी करतात.

आमच्यामध्ये हिंदू – मुस्लीम असं काहीच नाही –

आम्ही गेली 40 ते 45 वर्षे गणेशोत्सव असो किंवा ईद दोन्ही सण मोठ्या उत्साहाने साजरे करतो. आम्ही कधीही हिंदू मुस्लीम असा भेद केला नाही.या सणासुदीच्या काळात दोघांच्याही घरी आनंदाचे आणि भक्तिपूर्ण वातावरण असते असं बादशाह फरास आणि अमर जगताप सांगतात.

समाजात असेच जिवलग मित्र असतील आणि सामाजिक एकोपा टिकवण्याचं काम करत असतील तर समाजासाठी हे आदर्शवतच म्हणावं लागेल.