कोल्हापूर (प्रतिनिधी) : सेंद्रिय शेती ही एक अशी शेती पद्धत आहे ज्यामध्ये रासायनिक खते कीटकनाशके आणि इतर कृत्रिम रसायनांचा वापर टाळून नैसर्गिकरित्या पिके आणि प्राणीधन वापरले जाते. सेंद्रिय शेती मातीची सुपीकता वाढवते, पाण्याची धारण क्षमता वाढवते आणि मातीतील सूक्ष्मजीवांची संख्या वाढवते. कीटकांना नियंत्रित करण्यासाठी फेरोमोन, कीटकनाशक वनस्पती वापर सेंद्रिय शेती पर्यावरणासाठी हानिकारक नाही.

समाजात आरोग्य आणि पर्यावरणाची जागरूकता वाढत असल्याने सेंद्रिय शेतीची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही वर्षांपासून सेंद्रिय शेतीचा ट्रेंड वाढत चालला आहे. देशभरातील लाखो शेतकरी आज सेंद्रीय शेतीकडे वळले आहेत. सरकारकडून सेंद्रिय शेतीलाही सातत्याने प्रोत्साहन दिले जात आहे. देशभरातील लाखो शेतकऱ्यांनी आज सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली आहे. सेंद्रिय शेतीमधुन चांगले उत्पादन मिळण्यासाठी या गोष्टींकडे लक्ष देणे आत्यंत आवश्यक असते. जसे की सेंद्रिय शेतीमध्ये डीएपी-युरियासारख्या खतांऐवजी कुजलेले शेणखत किंवा शेणखताचा वापर केला जातो.

सेंद्रिय शेतीतही जीवामृत वापरले जाते. जे शेण, गोमूत्र, गुळाचे पाणी आणि बेसन मिसळून तयार केलेले द्रावण आहे. कडुलिंबाची पाने उकळून तयार केलेले द्रवाची कीटकनाशक म्हणून फवारणी केली जाते. अनेकांना सेंद्रिय शेतीमध्ये खत किती टाकावे हे माहितीच नसते. तुम्ही पहिल्यांदा सेंद्रिय शेती सुरू करणार असाल तर पेरणीपूर्वी एक एकर शेतात किमान 10 क्विंटल गांडूळ खत टाकावे. गरज भासल्यास पिकाला मोहोर येण्यापूर्वी 2 क्विंटल खत देता येते. गांडूळ खत आणि जीवामृत वापरल्याने जमिनीत निरोगी जीवाणू वाढतील ज्यामुळे मातीची सुपिकता अधिक वाढेल आणि पाण्याची पातळीही टिकून राहील.