डिसेंबर महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचे व्रत महत्त्वाचे असणार आहे. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही मोक्षदा एकादशी म्हणून ओळखली जाते. भगवान विष्णूच्या उपासनेसाठी मोक्षदा एकादशीचे व्रत विशेष मानले जाते. या दिवशी उपवास केल्याने तुम्हाला भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो. तसेच पूर्वजांना मोक्ष मिळण्याचा मार्ग मोकळा होतो.
मोक्षदा एकादशीच्या दिवशी पितरांच्या नावाने वस्तू दान करण्याचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगण्यात आले आहे. तसेच या दिवशी श्रीविष्णूने अर्जुनाला गीतेचा उपदेशा दिला होता म्हणून मोक्षदा एकादशीच्या दिवशी गीता जयंती देखील साजरी केली जाते. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा विधीपूर्वक केली जाते. जाणून घेऊया मोक्षदा एकादशीचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत..!
मोक्षदा एकादशी मुहूर्त –
मोक्षदा एकादशी तिथी ११ डिसेंबर २०२४ रोजी पहाटे ०३ वाजून ४२ मिनिटांनी सुरू होईल आणि १२ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ०१ वाजून ०९ मिनिटांनी संपेल. उदया तिथीनुसार ११ डिसेंबर रोजी एकादशी साजरी केली जाईल.
मोक्षदा एकादशी व्रत पारण वेळ –
मोक्षदा एकादशी व्रत पारणा १२ डिसेंबर २०२४, गुरुवार रोजी साजरा केला जाईल. मोक्षदा एकादशी व्रत पारणाची वेळ सकाळी ०७.०४ ते ०९.०८ अशी असेल. पारण तिथीच्या दिवशी द्वादशीची शेवटची वेळ रात्री १०.२६ आहे.
मोक्षदा एकादशी पूजा विधी –
घर स्वच्छ करा. रोजचे काम उरकून पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे. यानंतर आचमन करून स्वतःची शुद्धी करा. पिवळ्या रंगाचे कपडे घाला. आता सूर्यदेवाला जल अर्पण करा. यानंतर पंचोपचार करून विधीनुसार भगवान विष्णूची पूजा करावी. यावेळी भगवान विष्णूला पिवळी फुले, फळे, पिवळे वस्त्र, हळद, नारळ इत्यादी अर्पण करा. पूजेच्या वेळी विष्णू चालिसाचे पठण करा. त्याच वेळी, पूजेच्या शेवटी आरती करा. दिवसभर उपवास ठेवा. त्याचबरोबर संध्याकाळी आरती केल्यानंतर क्षमा प्रार्थना करावी. यादिवशी फराळ करावा, पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा.