कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला साजरा केला जातो. कोजागिरी पौर्णिमेलाच शरद पौर्णिमा असं देखील म्हणलं जात . हिंदू कॅलेंडरनुसार, संपूर्ण वर्षभरात 12 पौर्णिमा तिथी असतात यामध्ये कोजागिरी पौर्णिमा सर्वात विशेष मानली जाते. यांचं कारण सुद्धा तितकेच महत्वाचं आहे.

कोजागिरी पौर्णिमेला चंद्राच्या प्रकाशात दूध आटवण्यामागचे शास्त्रीय कारण

कोजागिरी पौर्णिमेला चंद्र हा पृथ्वीच्या जवळ असतो. चंद्राच्या प्रकाशात विशेष सकारात्मक उर्जा असते. या दिशी रात्री चंद्राच्या प्रकाशात दुध आटवल्याने त्याची किरणे दूधात पडतात. हिवाळ्याची सुरूवातीच्या काळात शरद पौर्णिमा येते. ऋतू बदल झाल्यानंतर अनेक संक्रमीत आजार बळावतात. तसेच आपल्या या काळात आपल्या शरिराला विशेष उर्जेची गरज असते. चंद्राच्या प्रकाशात आटवलेले दुध पिल्याने रोगप्रतीकारक शक्ती वाढते. या निमीत्त्याने मित्र मंडळी आणि परिवारातील सदस्य एकत्र येतात. भेटीगाठी होतात. त्यामुळे याला सामाजीक दृष्टीकोणातूनही महत्त्वाचे मानले जाते.

कोजागिरी पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व

पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता, त्यामुळे ही तिथी धनप्राप्तीसाठी सर्वोत्तम मानली जाते. या दिवशी श्रीकृष्ण अवतार, धनाची देवी लक्ष्मी आणि सोळा कलेच्या चंद्राची पूजा केल्याने विविध वरदान प्राप्त होतात. शरद पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. या दिवशी चंद्रप्रकाश सर्वात तेजस्वी असतो. या दिवशी चंद्रप्रकाशातून अमृतवृष्टी होते, या श्रद्धेमुळे लोकं दूध आटवून ती चंद्रप्रकाशात ठेवतात, जेणेकरून चंद्राची किरणे त्यात पडतील. हे दूध सर्वांना प्रसाद म्हणून दिले जाते.

यंदा कोजागिरी पौर्णिमा आहे कधी..?

वैदिक पंचांगानुसार, यावर्षी कोजागिरी पोर्णिमा अश्विन शुक्ल पौर्णिमा तिथी 16 ऑक्टोबर रोजी बुधवारी रात्री 8 वाजून 40 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर ही तिथी पुढच्या दिवशी 17 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4 वाजून 55 मिनिटांपर्यंत असणार आहे. 16 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा आहे. या दिवशी कोजागिरी पौर्णिमेला चंद्रोदय संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी असणार आहे. या दिवशी रात्री मोकळ्या आकाशात खीर ठेवण्याची वेळ रात्री 08 वाजून 40 मिनिटांनी असणार आहे.