मुंबई : स्वप्नील जोशी हा कायम चर्चेत असणारा अभिनेता आणि निर्माता म्हणुन ओळखला जातो. स्वप्नील जोशी हा कायम सोशल मीडियावर सक्रिय असतोच आणि तो आपल्या कामाबद्दल देखील माहिती देत असतो. तर असच एका फॅनने स्वप्नीलला मुंबई पुणे मुंबई 4 येणार का? असा प्रश्न विचारल्यानंतर स्वप्नीलने त्याला उत्तर देताना चक्क चित्रपटाच्या दिग्दर्शक सतीश राजवाडे आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे हिला यात टॅग करून नेवर से नेवर असे लिहिले आहे.

तर स्वप्नील जोशीने अजून काही माहिती दिलेली नाही आहे. आता या बातमीने चाहत्यांना आनंद मिळालेला आहे. ‘मुंबई पुणे मुंबई’ चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले.यानंतर या चित्रपटाचे आणखी दोन भाग रिलीज झाले होते. ‘मुंबई पुणे मुंबई २’ आणि ‘मुंबई पुणे मुंबई ३’ या चित्रपटाला देखील प्रेक्षकांनी सिनेमागृहात खूप प्रतिसाद मिळाला होता.तर या तिन्ही चित्रपटातील गाणी चाहत्यांना खूप आवडली गेली. आता चाहत्यांना खरंच ‘मुंबई पुणे मुंबई 4’ आतुरता लागून राहिली आहे.

स्वप्नील जोशीच्या या इंस्टाग्राम स्टोरी नंतर मुंबई पुणे मुंबई 4 नक्की येणार का? स्वप्नील आणि मुक्ता ची जोडी पुन्हा प्रेक्षकांना बघायला मिळणार का? अश्या अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. मुंबई पुणे मुंबई या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात वेगळ घर निर्माण केले आहे. अभिनेत्याच्या या प्रश्नाच्या उत्तरकडे सगळ्या चाहत्यांची नजर लागुन राहिलेली आहे. सध्या स्वप्नील त्याचा नव्या चित्रपटाची तयार करत असून येणाऱ्या वर्षात अनेक विविध भूमिका साकारणार आहे.