कोल्हापूर(प्रतिनिधी): इच्छित देवी देवतांचा नामजप करून एक-एक चिमूटभर कुंकू मूर्तीवर किंवा फोटोमधील पायापासून डोक्यापर्यंत 108 वेळेस वाहिल्याने मनातल्या इच्छा पूर्ण होतात.महिलांच्या सौभाग्यासाठी कुंकुमार्चन सोहळा केला जातो अस म्हणतात की श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते आणि या मूर्तीतील शक्तीची तत्व कुंकवात येतात अशी आख्यायिका आहे.नवरात्रौत्सवात कुंकुमार्चन पुण्यकारक आणि लाभदायक असते.
कुंकुमार्चन म्हणजे काय ?
देवीचा नामजप करत एक-एक चिमूटभर कुंकू देवीच्या पायापासून सुरू करून तिच्या डोक्या पर्यंत वाहले जाते किंवा देवीला कुंकवाने अभिषेक घालणे म्हणजेच कुंकुमार्चन होय.कुंकुमार्चन करत असताना देवीच्या नामजपामध्ये देवीचा मंत्र, श्री सुक्त, देवी स्तुती किंवा नवार्ण मंत्र या गोष्टीं आणि पठण केले जाते.
कुंकुमार्चन कधी करावे?
कुंकुमार्चन हे अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा, नवरात्र, लक्ष्मीपूजन,या दिवशी केले जाते.तर मंगळवार, शुक्रवार, पोर्णिमा गुरुपुष्यामृत योग या दिवशी कुंकुमार्चन करावे.आणि अमावस्येला कुंकुमार्चन कधीही करु नये.आश्विन नवरात्रात सप्तशती चे पाठ वाचण्यापूर्वी किंवा पाठ वाचत असताना कुंकुमार्चन करावे असे केल्यास ते खूप पुण्यकारक व शुभफलदायी आहे.कुंकुमार्चन करुन अर्पण केलेले साठलेले कुंकु एका डबीत भरून ठेवावे.कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते.कार्यसिध्दीसाठी सहायता होते