कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : गेल्या काही दिवसांपासून ब्रेन रॉट या शब्दांची चांगलीच चर्चा रंगली आहे. आजकाल मोबाईल फोन काळाची गरज बनला आहे. इंटरनेट स्वस्तात उपलब्ध झाल्याने अनेक लोक सोशल मीडियावर तासंतास स्क्रोलिंग करत बसतात. या स्क्रोलिंगच्या सवयीसाठी एक शब्द वापरला जातो तो म्हणजे ब्रेन रॉट. ऑक्सर्फ्डने त्याला वर्ड ऑफ द इयर म्हणून देखील घोषित केले आहे.
ब्रेन रॉट ही एक मानसिक स्थिती आहे ज्यामध्ये स्क्रीनशी जास्त वेळ जोडलेले राहिल्याने मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो. यामुळे मानसिक थकवा, लक्ष न लागणे, स्मरणशक्ती कमी होणे आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. स्क्रीनवर जास्त वेळ घालवल्याने मेंदूचे कार्य मंदावते, ज्यामुळे मानसिक क्षमता कमी होते.
ब्रेन रॉटची कारणे
फोनवर बराच वेळ संपर्कात राहणे, विशेषतः रात्री. डिजिटल ओव्हरलोड म्हणजे सोशल मीडियावर जास्त वेळ घालवणे. जर तुम्ही एकाच वेळी अनेक कामे करत असाल तर त्याचा मेंदूवरही परिणाम होतो, त्यामुळे मेंदूची फोकस पॉवर कमकुवत होते. ही ब्रेन रॉटची प्रमुख कारणे आहेत.
ब्रेन रॉटची लक्षणं
- लक्ष केंद्रित करणे किंवा सर्जनशीलता यासारखी मानसिक कार्ये करण्यास अक्षम आहात.
- फोन स्क्रीनच्या जास्त संपर्कामुळे नैराश्य, एकटेपणा आणि चिंता या भावना येऊ शकतात.
- जे लोक फोनचा जास्त वापर करतात, त्यांची कामातील रुची कमी होते. खरे तर असे घडते कारण कामातील निष्काळजीपणामुळे आपण आपले मन फोनमध्ये अधिक व्यस्त करतो.
ब्रेन रॉट टाळण्यासाठी फोन मर्यादित वापरणे. मल्टीटास्किंग टाळणे तसेच चांगल्या आणि सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे.