मुंबई : आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलीय . दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिट चर्चा देखील झाली, मात्र नेमकी कशावर चर्चा झाली, हे अद्याप समोर आलेलं नाहीये. परंतु या भेटीची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरूय.. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रया दिली आहे..
काय म्हणाले उद्धव ठाकरे..?
उद्धव ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रात सुस्कृंत राजकारणाची अपेक्षा आहे. त्यांचं सरकार स्थापन झालेलं आहे. दुर्देवानं आमचं सरकार आलं नाही. महाराष्ट्राच्या हिताची अपेक्षा त्यांच्याकडून आहे. ते कसे जिंकले हे अनाकलनीय आहे. आम्ही जनतेच्या माध्यमातून हा प्रश्न मांडू. देवेंद्र फडणवीस यांची भेट कशासंदर्भात होती ते कळेल”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.