मुंबई – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. तर सोनाक्षी सिन्हा ही अभिनेता जहीर इकबालला डेट करत असल्याचे दिसून येतंय. त्याच्यासोबत ती नेहमी पार्टी आणि कार्यक्रमात दिसून येते. मिळालेल्या माहितीनुसार, सोनाक्षी 23 जून रोजी मुंबईत लग्न करणार आहे. त्यानंतर चाहत्यांमध्ये तिच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे.पण या सगळ्या सध्या तरी चर्चा असून त्यावर सोनाक्षीने कोणत्याही प्रकारचं शिक्कामोर्तब केलेलं नाहीये. त्यातच आता तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे पुन्हा एकदा भलत्याच चर्चांना उधाण आलंय.
काय म्हणाले शत्रुघ्न सिन्हा..?
एका मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा यांना सोनाक्षीच्या लग्नावर प्रश्न विचारण्यात आला, यावर शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, , मी निवडणुकांच्या निकालानंतर दिल्लीतच आहे. त्यामुळे अजूनतरी मी माझ्या लेकीच्या लग्नाबद्दल किंवा त्याच्या प्लॅन्सविषयी कोणाशी बोललो नाहीये. आता राहिला प्रश्न सोनाक्षी लग्न करतेय का? तर याचं उत्तर म्हणजे मला तिने याबद्दल अजूनतरी काहीही सांगितलं नाहीये. जेवढ्या बातम्या आल्या होत्या, तितकचं मी वाचलं आहे आणि तेवढच मला माहियेत. मला आणि माझ्या बायकोला जर माझ्या मुलीने विश्वासातून घेऊन सांगितलं तर आम्ही त्या दोघांना आशिर्वाद द्यायला नक्की जाऊ. ते दोघे कायम आनंदी रहावे अशीच इच्छा आहे.
यावेळी त्यांनी थेट या लग्नाविषयी त्यांना कोणतीही कल्पना नसल्याचं म्हटलं आहे. तसेच सोनाक्षीने अद्याप याबाबत काहीही सांगितलं नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. त्यामुळे पुन्हा एकदा सोनाक्षीच्या नात्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. तसेच जरी सोनाक्षी लग्न करणार असली तरीही तिच्या वडिलांना याबाबत कोणताही कल्पना नाही का? असाही प्रश्न निर्माण केला जातोय.