कोल्हापूर (प्रतिनिधी ): आमदार सतेज पाटील यांच्या अथ्थक प्रयत्नातून फुलेवाडी रिंगरोडवरील बोंद्रे नगर मातंग वसाहतीमधील प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत 77 कुटुंबियांना घरकुल मंजूर झाली आहेत.सुरू असलेल्या घरकुलांची कामे सप्टेंबर महिन्याच्या आत पूर्ण करावीत, अशा सूचना आमदार सतेज पाटील यांनी कंत्राटदार आणि अभियंत्यांना केल्या. या घरकुलांच्या पाहणीदरम्यान कंत्राटदार, अभियंते, महापालिका आणि महावितरण कंपनीचे अधिकारी यांच्यासोबतच्या बैठकीत ते बोलत होते.
लाभार्थ्यांना किती रूपयांची सबसिडी मिळणार…
या परिसरात वीज , पाणी कनेक्शन व चांगले रस्ते करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.घरकुलासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2.5 लाख रुपयांची सबसिडी, सीएसआर फंडातून 50 हजार तर शेल्टर असोसिएट्सद्वारे 30 हजार असे एकूण 3 लाख 30 हजार रुपये मिळणार असून लाभार्थ्याला 2 लाख 70 हजार भरावे लागणार आहेत. या योजनेतील 77 पैकी 27 घरकुलांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित 50 घरकुलांचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.