मुंबई : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाला चांगलं यश मिळालं, तर फक्त 10 आमदार निवडून आल्यानं शरद पवार आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. मात्र, त्यानंतर या सर्व घडामोडी घडून गेल्यानंतर अजित पवार आज शरद पवार यांची भेट घेत आहेत. निमित्त जरी वाढदिवसाचं असेल, तरी यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.आता यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे..
संजय राऊत म्हणाले..?
निर्ढावलेले लोक महान माणसावर चिखलफेक करुन शुभेच्छा द्यायला आले अशा शब्दात संजय राऊत यांनी अजितदादांवर टीका केली आहे. शुभेच्छा देणे ही आपली संस्कृती आहे. आमचा धीर नसता झाला आम्ही असे काम केले असते तर… मी जर पाठीत खंजीर खुपसला असता तर असे शुभेच्छा देण्याचे धाडस केले नसते असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.तर राजकारणा पलिकडे कौटुंबिक संबंधही असतात असे अजित पवार यांनी म्हटले आहे.