मुंबई – अशी ही बनवाबनवी या चित्रपटाने मराठी सिनेमासृष्टीला नव्या शिखरावर नेऊन पोहचवले. 1988 ला रिलीझ झालेल्या या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड तोडले होते . आज ही लोक हा चित्रपट जेव्हा टीव्ही वर लागतो तेव्हा अत्यंत आवडीने बघतात. या चित्रपटामध्ये सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे. अशोक सराफ आणि सिद्धार्थ रे या अभिनेत्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. सिद्धार्थ रे या अभिनेत्याने या चित्रपटातून पदार्पण केलं होत. तर सचिन पिळगावकर एबी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या सिनेमामध्ये सर्व कलाकारांनी दमदार भूमिका साकारली होती. या सिनेमातील हृदयिवसंत फुलतानाचे गाणं आज ही लोकांच्या ओठी आहे. अशातच आता अशी ही बनवाबनवीच्या सिक्वेल येण्याची चर्चा सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये रंगली आहे. आता यावर दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले सचिन पिळगावकर..?
‘अशी ही बनवाबनवी’च्या सिक्वेलची इच्छा अनेकांनी व्यक्त केली होती. आता, यावर दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी थेट भाष्य केले आहे. सचिन पिळगावकर यांनी रेडिओ सिटीला दिलेल्या मुलाखतीत ‘अशी ही बनवाबनवी’च्या सिक्वेलबाबत भाष्य केले आहे. सचिन यांनी म्हटले की, हा सिनेमा लक्ष्याशिवाय नाही बनू शकत. फक्त लक्ष्या नव्हे तर सुशांतची भूमिका साकारलेला सिद्धार्थदेखील नाही आहे. सुधीर जोशी, वसंत सबनीस, अरुण पौडवाल, शांताराम नांदगावकर असे ‘अशी ही बनवाबनवी’च्या टीममधील अनेक लोक आज आपल्यात नाहीत. या सिनेमासाठी या सगळ्यांचं योगदान होतं. त्यामुळे ही मंडळीच नाहीत तर सिनेमा पुढे जाऊ शकत नाही, असे भावूक उत्तर त्यांनी दिले. सचिन यांनी पुढे म्हटले की, काही गोष्टी आपल्या हातात नसतात. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे ‘अशी ही बनवाबनवी’. हा चित्रपट मी बनवलाय, असं मी म्हणूच शकत नाही. हा चित्रपट आम्ही एकत्र येऊन बनवला. आणि लोकांनी तो मोठा केला, असेही सचिन यांनी नमूद केले. त्यामुळे सचिन पिळगावकर यांनी अशी ही बनवाबनवीच्या सिक्वेलवर चर्चेवर पूर्णविराम दिल आहे.