मुंबई ( प्रतिनिधी ) : भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला जिंकण्यासाठी 340 धावा करायच्या होत्या. मात्र या लक्षाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव अवघ्या 155 धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाला 184 धावांनी डाव गमवावा लागला आहे. तर या सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियाने 1-2 ने आघाडी घेतली आहे.

चौथ्या कसोटीतील पराभवानंतर रोहित पत्रकार परिषदेत म्हणाला, “आज मी जिथे उभा होतो तिथे उभा आहे, एक कर्णधार आणि फलंदाज म्हणून काही निकाल आमच्या वाट्याला आले नाहीत, हे निराशाजनक आहे. मानसिकदृष्ट्या हे चिंताग्रस्त झाले आहे परंतु आत्तापर्यंत, काही गोष्टी आहेत ज्या मला एक संघ म्हणून पाहण्याची आवश्यकता आहे. सिडनी टेस्टमध्ये आम्हाला संधी आहे की आम्ही कमबॅक करू शकू. आम्ही त्यासाठी प्रयत्न करू आणि चांगला खेळ खेळू”, असे रोहितने म्हंटले आहे.

बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेचा शेवटचा पाचवा सामना 3 जानेवारीपासून सुरु होणार आहे. या मालिकेत जर टीम इंडियाला बरोबरी करायची असल्यास भारताचा संघाला शेवटचा सामना जिंकणे अनिवार्य आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी सुद्धा भारताला हा सामना महत्वाचा असणार आहे.