मुंबई – बॉलीवूडमधल्या सगळ्यात प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक असलेलं जोडपं म्हणजे करिना कपूर खान आणि सैफ अली खान सैफ आणि करिनाने 2012 मध्ये लग्नगाठी बांधली. त्यानंतर त्यांचा सुखी संसार सुरु झाला. त्यांना तैमूर आणि जेह अशी दोन मुलं देखील आहेत. पण नुकतच करिना आणि सैफच्या संसाराविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. स्वत: करिनानेच य गोष्टीचा खुलासा केला आहे.
एका मुलाखतीमध्ये करिनाने त्यांच्या संसाराविषयी भाष्य केलं आहे. यावेळी तिने सांगितलं की, ‘सैफ अली खान याच्यासोबत लग्न केल्यामुळे मी पूर्वीपेक्षा अधिक जबाबदार आणि डाऊन टू अर्थ झाली आहे. आम्ही एकमेकांमध्ये असलेल्या कमतरता पूर्ण करतो. मी त्रासलेली असेल तर, सैफ मला समजवतो. तर सैफ कधी त्रासलेला असेल तर मी त्याची समज काढते.
असं अनेकदा होतं एकाच घरात राहून देखील आम्ही एकमेकांना भेटत नाही. कारण कामामुळे आमची शिफ्ट वेगळी असते. व्यस्तवेळापत्रकामुळे काम आणि नात्यांवर प्रभाव पडतो. घरात देखील आमची कधी भेट होत नाही… त्यामुळे वाद देखील होतात…’
पुढे करीना म्हणाली, ‘अनेकदा असं झालं आहे की, आम्ही कॅलेंडर पाहातो आणि एक असा दिवस निवडतो, जेव्हा आम्ही एकत्र घरी राहातो आणि वेळ व्यतीत करतो… आमच्यात अनेक गोष्टींमुळे भांडणं देखील होतात. पण फार लहान गोष्टींमुळे…’
‘मला एसीचं तापमान 20 डिग्रीपर्यंत हवं असतं. पण सैफला प्रचंड गर्मी होते. त्याला 16 डिग्री सेल्सियस तापमान लागतं. अखेर प्रकरण तडजोडीपर्यंत येतं आणि आम्ही म्हणतो चला 19 ला तडजोड करू. त्यानंतर एसीचं तापमान 19 डिग्री सेल्सियसपर्यंत येतं… कारण मला माहिती आहे की, एसीच्या तापमानामुळे देखील घटस्फोट झाली आहेत.’
सतत होणाऱ्या भांडणांबद्दल देखील करीना हिने मोठं वक्तव्य केलं आहे. करीना म्हणाली, ‘व्यस्तवेळापत्रकामुळे आम्ही एकमेकांना वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे आमची भांडणं होतात. सैफ आणि माझ्यात कधीच पैसे आणि इतर कोणत्याच कारणांमुळे भांडणं झालेली नाहीत…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.