कळे ( प्रतिनिधी ) : अवघे गर्जे पंढरपूर।।चालला नामाचा गजर – – – – – दिंडी चालली पंढरीला… आज माघ वारी. आषाढी आणि कार्तिकी इतकीच महत्वपूर्ण असणारी ही एकादशी आहे. माघ वारी निमित्त पंढरपूरला निघालेल्या तिरपण दिगवडे ( ता.पन्हाळा ) पायी दिंडीला वारकरी सांप्रदायिकचे प्रमुख आणि मरळी गांवचे सामाजिक कार्यकर्ते ह.भ.प. आनंदा पाटील आणि आनंदा गुरव यांनी प्रविण आनंदा पाटील याचा वाढदिवस अवास्तव खर्च करून साजरा न करता वाढदिवसाची भेट म्हणून दिंडीला साऊंड सिस्टिम्स भेट दिली. 

वाढदिवसाला वायफळ खर्च करण्यापेक्षा धार्मिक कार्याला त्याचा उपयोग व्हावा म्हणून कुची ता. कवठेमहांकाळ येथे जावून दिंडीला साऊंड सिस्टीम भेट दिली. यावेळी दिंडी चालक मारुती जाधव, विणेकरी अर्जुन गुरव, सरदार पोवार, मधुकर बोळावे, अभिजित पाटील, रामभाऊ चेचर, मयूर पाटील, शंकर पाटील आणि दिंडीतील सर्व वारकरी हजर होते.