कोल्हापूर (प्रतिनिधी) : विश्व हिंदू परिषदेच्या वतीने संपूर्ण देशात गीता जयंतीनिमित्त शौर्य सप्ताह साजरा केला जातो. या निमित्ताने कोल्हापूर जिल्हा विश्व-हिंदू परिषदेच्या वतीने बजरंग दल शौर्य संचलन रविवारी दि. 15 रोजी शहरात करण्यात येणार आहे.
मिरजकर तिकटी येथून सकाळी दहा वाजता या संचालनास प्रारंभ होईल महाद्वारा रोड, पापाची तिकटी ,महानगरपालिका ,सीपीआर चौकातील राजर्षी छत्रपती शाहू रायांच्या पुतळ्याजवळ समारोप करण्यात येणार आहे. तरी संचलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा मंत्री अनिल दिंडे, जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील, संयोजक सुरेश रोकडे यांनी केले आहे. कोल्हापूरसह सर्व तालुकास्तरावर आयोजन करण्यात आले आहे.