कोल्हापूर (प्रतिनिधी) : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढण्यासाठी मतदारांच्या जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. याच अनुषंगाने 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजता “लोकशाही दौड” चे आयोजन केले आहे. या लोकशाही दौड मध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

ही दौड दिनांक 15 नोव्हेंबर रोजी होणार होती, परंतू या तारखेत बदल होवून आता 9 नोव्हेंबर रोजी दौड होणार आहे. पोलिस परेड ग्राऊंड, कसबा बावडा येथून सुरुवात होणाऱ्या या दौड मध्ये नागरिक आणि विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी सहभागी होणार आहेत. दौड मध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी सोबत दिलेल्या गुगल फॉर्म मध्ये नाव नोंदणी करावी, असे आवाहन स्वीपच्या नोडल अधिकारी तथा कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी आणि नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी केले आहे.

दौड मध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी https://tinyurl.com/SveepRunKolhapur या लिंकवर नाव नोंदणी करावी.