कोल्हापूर (प्रतिनिधी) : जागतिक पातळीवरील मोटोहाऊस, केएडब्लू व्हेलोसे मोटर्स प्रा. लि. या देशातील प्रमुख मोटारसायकल कंपनीने कोल्हापुरात आपला अधिकृत डीलर भागीदार म्हणून व्हेलोसे मोटर्ससह आपली प्रमुख आणि दुसरी डीलरशिप दाखल केली. हा मैलाचा दगड मोटोहॉसची भारतातील पाऊलखुणा वाढवण्याची वचनबद्धता दर्शवत आहे. शहरातील मोटरसायकल चालकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेल्या मोटारसायकल आणि इको-फ्रेंडली स्कूटरची उत्तम श्रेणी कंपनीने सादर केली आहे.
या नव्या शोरूममध्ये अलीकडेच दाखल करण्यात आलेल्या ऑस्ट्रियन ब्रँड ब्रिक्स्टनच्या क्रॉसफायर 500 एक्स, क्रॉसफायर 500 एक्ससी, क्रॉमवेल 1200, क्रॉमवेल 1200 एक्स या मोटारसायकलींसह इटालियन ब्रँड व्हीएलएफ टेनिस इलेक्ट्रिक स्कूटर अशी प्रीमियम दुचाकी वाहने उपलब्ध करण्यात आली आहेत. मोटोहॉसने नुकत्याच दाखल केलेल्या या जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या बाइक्स भारतीय रायडर्सच्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या आहेत. यावेळी बोलताना केव्हीएमपीएल-मोटोहाऊसचे व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके म्हणाले, “मोटोहॉस आणि केएडब्लू व्हेलोस मोटर्सचा उद्देश भारतीय ग्राहकांना प्रीमियम, वैविध्यपूर्ण दुचाकी वाहने देणे हा आहे.
परंपरा आणि नावीन्य या दोहोंचा यात संगम आहे. आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासह देशांतर्गत उत्पादनाला चालना देऊन कामगिरी, टिकाऊपणा आणि स्थानिक नावीन्यपूर्णतेला प्राधान्य देत भारताच्या दुचाकी उद्योगात परिवर्तन घडवून आणत आहोत. ”ग्राहकांना आरामदायक आणि सुखद अनुभव देण्याच्या दृष्टीने याची रचना करण्यात आली आहे. मोटोहाऊस विक्रीपश्चात उत्तम सेवा आणि वॉरंटीसह ग्राहकांचा मालकी अनुभव अधिक उत्तम करते.
ब्रिक्सटन मोटरसायकल दोन वर्षांची वॉरंटी आणि दोन वर्षांची विस्तारित वॉरंटी देते, तर व्हीएलएफ टेनिस इलेक्ट्रिक स्कूटरवर दोन वर्षांची वॉरंटी आणि बॅटरीवर तीन वर्षांची वॉरंटी मिळते. मोटोहॉस मुंबई, पुणे, चेन्नई, जयपूर, अहमदाबाद आणि गोव्यासह टियर एक आणि टियर दोन शहरांमध्ये प्रीमियम रिटेल दालने सुरू करत आहे. या ब्रँडने जून 2025 पर्यंत 20 डीलरशिप प्रमुख शहरात देण्याचे नियोजन आहे.